मुंबई 19 जून: भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC Bank) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेचे ग्राहक आता 1 लाखांपर्यंत रक्कम बँकेतून काढू शकणार आहेत. या आधी ही मर्यादा 50 हजारांपर्यंत होती. या निर्णयाचा बँकेच्या तब्बल 84 टक्के खातेदारांना फायदा होणार असल्याचं बँकेने म्हटलं आहे. त्याचबरोबर बँकेवरचे निर्बंध पूर्वीसारखेच राहणार असल्याचं बँकेने म्हटलं आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले होते. आता पुन्हा त्यात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत 6 महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसंच ठेवी स्वीकारता येणार नाही.
चीन वाद: सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला हा थेट आरोप, मागितलं आश्वासन
या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.
कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत झळकला दुसऱ्या क्रमांकावर
कोरोनारुग्णांच्या संख्येत का होत आहे वाढ? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PMC, Rbi latest news, Reserve bank of india