मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजपचे नेते प्रवीण दरेकर- किरीट सोमय्यांना घरी बोलावलं होतं का? रामदास कदम म्हणाले...

भाजपचे नेते प्रवीण दरेकर- किरीट सोमय्यांना घरी बोलावलं होतं का? रामदास कदम म्हणाले...

 रामदास कदम (ramdas kadam audio clip) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रामदास कदम (ramdas kadam audio clip) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रामदास कदम (ramdas kadam audio clip) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 02 ऑक्टोबर : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (ramdas kadam audio clip) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांना (kirit somiya) माहिती दिली आणि प्रवीण दरेकर (praveen darekar) यांना घरी जेवायला सुद्धा बोलावले असाही आरोप झाला. मात्र, जी लोक सेनेच्या मुळावर उठली आहे, त्यांना मी घरी कसं बोलवणार? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थितीत करत सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्याच बरोबर एका ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांचाही उल्लेख झाला आहे.  त्यानंतर रामदास कदम यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना खुलासा केला आहे.

'त्या ऑडिओ क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की सोमय्यांची पत्रकार परिषद झाली तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, असं मी त्याच म्हटलं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण, जो माणूस शिवसेनेच्या मुळावर उठला आहे, त्याला मी कशाला बोलवणार? असा सवालही कदम यांनी केला.

IPL 2021 मध्ये कोणत्याच खेळाडूची Dope Test होणार नाही, समोर आलं कारण

'प्रवीण दरेकर हे कधीच माझ्याकडे आले नाही, असं कधीच घडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल कशा प्रकारे प्रतिमा तयार होईल, याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब आणि माझ्यामध्ये चांगले संबंध आहे, कोणतीही कटुता नाही' असंही कदम म्हणाले.

तसंच, 'अशी ही क्लिप पहिल्यांदाच आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा माझ्या आवाजात अशा क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. याबद्दल मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघेही शिवसेनेत होते. दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं. दोघांनी शिवसेनेशी बेईमानी करून निघून गेले. माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे' अशी टीकाही कदम यांनी केली.

'प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. तो एक हा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्या सर्व पक्षांसोबत संबंध आहे. माझं त्यांचं असं काही बोलणं झालं नाही' असंही कदम म्हणाले.

पतीविरुद्ध तक्रार नोंदवणारी महिला अडकली पोलिसाच्या प्रेमपाशात, झाली फसवणूक

'वैभव खेडेकर याची नगरपरिषदेतील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली होती. त्यांना अपात्र करण्यासाठी मी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आज हे आरोप केले आहे' असा दावाही कदम यांनी केला.

'त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही, विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझ्या आवाज ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. खेडमध्ये माझ्यावर आरोप केले की राजकीय पोळी भाजून निघते. असं कटकारस्थान दोघांनी केलं आहे. याआधीही दोघांनी पत्रकार परिषदा घेऊन आरोप केले आहे, त्या दोघांविरोधात मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला आहे, आताही कोर्टात जाणार आहे' असा इशाराही कदम यांनी दिला.

First published: