मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीविरुद्ध तक्रार नोंदवणारी महिला अडकली पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमपाशात, झाली फसवणूक

पतीविरुद्ध तक्रार नोंदवणारी महिला अडकली पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमपाशात, झाली फसवणूक

पतीकडून होत असलेल्या अन्यायाची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या महिलेला आपल्या (Complaint of fake marriage and rape against police officer) प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका पोलीस अधिकाऱ्याने फसवले.

  • Published by:  desk news

जयपूर, 2 ऑक्टोबर : पतीकडून होत असलेल्या अन्यायाची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या महिलेला आपल्या (Complaint of fake marriage and rape against police officer) प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका पोलीस अधिकाऱ्याने फसवले. आपण अविवाहित असल्याचं सांगत या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या (Lied to be single and promised to marry) पोलिसाविरुद्ध आता महिलेनं तक्रार केली आहे. महिलेनं आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर पोलिसाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

अशी झाली ओळख

राजस्थानमधील पालीमध्ये पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला आली होती. तिथं तक्रार नोंदवून घेता घेता तिची ओळख ड्युटीवर असणाऱ्या सब-इन्स्पेक्टर रामलाल मीणा याच्यासोबत झाली. आपण अविवाहित असल्याचं सांगून त्यानं महिलेला आपल्या प्रेमाच्या पाशात ओढलं. त्यानंतर 2016 साली एका स्टँप पेपरवर लग्नाचा करार करून एकत्र राहायला सुरुवात केली.

महिला राहिली गरोदर

लग्नानंतर ही महिला दोन वेळा गरोदर राहिली. मीणाने तिला दोन्ही वेळा गर्भपात करायला भाग पाडलं. 2020 साली मीणाचं अगोदरच लग्न झाल्याची कल्पना महिलेला आली. त्यानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र आपण लवकरच पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असून रितसर लग्न करणार असल्याचं आश्वासन मीणाने दिल्यावर महिलेने तक्रार मागे घेतली होती, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. आता वर्ष उलटूनही पती घटस्फोट घेण्याची कुठलीही लक्षणं दिसत नसल्यामुळे महिलेने पुन्हा एकदा मीणाविरोधात फसवणुकीने लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे.

हे वाचा - 96 वर्षीय महिलेवर आहे 11 हजार लोकांच्या हत्येचा आरोप; आता यामुळे पुन्हा चर्चेत

आरोपी मीणा विवाहित

आरोपी मीणा विवाहित असून तक्रारदार महिला ही त्याच्यापेक्षा तब्बल 15 वर्षांनी लहान आहे. आरोपी मीणा 42 वर्षांचा असून महिला 26 वर्षांची आहे. मीणाला दोन मुलंदेखील आहेत. आपण अविवाहित असल्याचं सांगून त्यानं महिलेला फसवलं होतं. त्याचप्रमाणं घटस्फोटित असल्याचं दाखवून कॉन्स्टेबलची नोकरी मिळवून देण्याचं आश्वासनदेखील दिलं होतं, अशी माहिती महिलेनं दिली आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Police, Rape