मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईमध्ये (mumbai) आज मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पुढील 12 तारखेपर्यंत शहरात रॅली, मोर्चे किंवा कोणतेही आंदोलन करता येणार नाही, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहे. (Rallies and marches are not allowed in Mumbai )
मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे.
48 वर्षांच्या Malaika Arora ने केलं असं Bold फोटोशूट, की...
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि संभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलं आहे.
Shocking! उंदीर चावल्याने महिलेला झाला कोरोना; Omicron च्या संकटात खळबळजनक बातमी
मात्र, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम वाहनांची रॅली राज्यभरातून मुंबई काढणार आहे. काही दिवसांपूर्वीच असादुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील यांनी याबद्दल घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगे झेंडे घेऊन मुंबईत पोहोचणार आहे. या मोर्चानंतर अकबरुद्दीन ओवैसी आणि असादुद्दीन ओवैसीची जंगी सभा होणार आहे. राज्यभरातून रॅली काढून ते मुंबईत 11 डिसेंबरला पोहोचणार आहे. एमआयएमकडून या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानिमित्याने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police