जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Sugarcane Farmer : यंदाच्या साखर हंगामात FRP मधून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आकड्यातही मोजता न येणारी, एवढे झाले उत्पादन

Sugarcane Farmer : यंदाच्या साखर हंगामात FRP मधून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आकड्यातही मोजता न येणारी, एवढे झाले उत्पादन

Sugarcane Farmer : यंदाच्या साखर हंगामात FRP मधून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आकड्यातही मोजता न येणारी, एवढे झाले उत्पादन

यंदा साखर हंगामातील गाळप मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाल्याने उत्पादन वाढणार आहे. (Sugar Factory)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : यंदा राज्याचा साखर हंगाम (State sugar season) अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने अद्याप सुरू आहे. (Sugar Factory) दरम्यान यंदा साखर हंगामातील गाळप मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाल्याने उत्पादन वाढणार आहे. याचबरोबर साखर उद्योगात यंदा होत असलेल्या विक्रमी गाळपामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपोटी (Sugarcane Farmer) मिळणारी रक्कम 42 हजार कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. दरम्यान ऊस तोडणीवरून राज्यात रोज वेगवेगळ्या नव्या घटना घडत आहेत. मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. यातील मराठवाड्यात उसाच्या तोडींना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील 60 कारखान्यापैकी 28 कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम आटोपला आहे. 23 मेपर्यंत सर्व कारखान्यांनी 3 कोटी 17 लाख 10 हजार 176 टन उसाचे गाळप करत 3 कोटी 16 लाख 97 हजार 990 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच आहे.

हे ही वाचा :  ‘शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे’, सदाभाऊंची राष्ट्रवादीवर खोचक टीका

राज्यभर सध्या केवळ शिल्लक उसाचीच चर्चा होते आहे. शिल्लक ऊस केवळ 19 लाख टनाच्या आसपास आहे. तो पुढील काही दिवसांत पूर्णतः गाळला जाईल. परंतु आतापर्यंत 1312 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप यशस्वीपणे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा 42 हजार कोटींची एफआरपी मिळण्याची शक्यता आहे.    

जाहिरात

साखर आयुक्तलयाच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना यंदा मिळणारा रास्त व किफायतशीर दर विक्रमी स्वरूपाचा असेल एफआरपी राहण्याचे प्रमाण देखील किफायतशीर दर (एफआरपी) विक्र साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार स्वरूपाचा असेल. एफआरपी थकित राहण्याचे प्रमाण देखील यंदा नगण्य आहे.

राज्यात अजून केवळ 8 लाख टनाच्या आसपास ऊस गाळपाविना उभा आहे. त्याचे तातडीने गाळप होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आता हार्वेस्टर अधिगृहीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मे अखेर बहुतेक सर्व ऊस गाळला जाईल. तरीही किरकोळ भागात ऊस राहिलाच तर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा कारखाने सुरू ठेवण्याचे नियोजन झाले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  अटल भूजल योजना नेमकी आहे तरी काय?  या जिल्ह्याने घेतला सर्वाधिक फायदा

पुढील हंगामात ती 12 हजार कोर्टाच्या पुढे जाणार आहे. राज्यात उसाची तोडणी व वाहतुकीपोटी सात हजार कोटी रुपये वाटले जाणार आहेत. बहुतेक भागात कष्टकरी मजूर, मराठवाड्यातील शेतकरी तसेच इतर भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचा सहभाग ऊसतोडणी व वाहतुकीच्या कामांमध्ये आहे. त्यामुळे हा सात हजार कोटींपैकी बराचसा भाग शेतकऱ्यांच्याच हातात जात आहे, असे निरीक्षण साखर इथेनॉल उद्योगातील राज्याची आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने उलाढाल यंदा 9 हजार कोटींची नोंदविले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात