मुंबई, 9 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या संदर्भातील वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राजीव सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे सातव यांच्या निधनाने दोन पदे रिकामी झाली आहेत. आता राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी आणि गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, महाराष्ट्रासह पाच राज्यांतील रिक्त जागांवर निवडणूक राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाकडून होत आहे. तर त्याच दरम्यान माजी केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा रंगत आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष कुणाला संधी देतं हे पहावं लागेल. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
Election Commission of India to hold Rajya Sabha bypolls for six seats - one each in West Bengal, Assam, Maharashtra & Madhya Pradesh & two seats in Tamil Nadu on October 4
— ANI (@ANI) September 9, 2021
Bypolls for an Assembly Council seat in Bihar to be held on October 4 pic.twitter.com/wj2AU0l7yv
महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.