मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /..मला असे मुसलमान हवे, राज ठाकरेंचं लाव रे व्हिडीओ, मनसेच्या इतिहास पहिल्यांदाच घडलं

..मला असे मुसलमान हवे, राज ठाकरेंचं लाव रे व्हिडीओ, मनसेच्या इतिहास पहिल्यांदाच घडलं

मनसेच्या इतिहास पहिल्यांदाच घडलं

मनसेच्या इतिहास पहिल्यांदाच घडलं

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसैनिकांना संबोधित केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : 'मला धर्मांध हिंदू नको तर मला धर्मभिमानी हिंदू हवा आहे' असे म्हणत राज ठाकरे यांनी त्यांची हिदुत्वाची व्याख्या सांगितली. गीतकार जावेद अख्तर यांचं उदाहरण देत पुन्हा एकदा लावरे तो व्हिडीओ म्हणत अख्तर यांच्या पाकिस्तानातील मुलाखतीचा व्हिडीओ दाखवण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा हाती घेतला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मला लोकांनी विचारलं, तुमची हिंदुत्त्वाची व्याख्या काय? माझ्या हिंदुत्वामध्ये तो असलाच पाहिजे, मला धर्मांध हिंदू नको, मलाभिमानी हिंदू हवा आहे. जो स्वत: चा धर्म देखील बघेल आणि दुसऱ्या धर्माचा देखील मान राखेल, जेवढाच तेवढा. मला माणसं हवी, मुस्लिम धर्मातली माणसं हवी, मला जावेद अख्तर यांच्या सारखी माणसं हवी, पाकिस्तानमध्ये जाऊन कुणी खडेबोल सुनावले नाही. तिथे कुरापती काढत असतील तिथे त्याच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, मध्यंतरी गाजलं, मला अपेक्षित असलेला भारतीय, महाराष्ट्राचा मुस्लिम कसा हवा, त्यांना दोन शब्द सुनावणारा माणूस हवा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

आज सर्व प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, बऱ्याच काळानंतर बोलतोय, अनेकांनी मला विचारलं. एवढे मोठाले स्क्रिन कशाला लावले, म्हटलं भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहे. अरे काही तरी उद्देश असेल म्हणून लावले आहे ना.

महाराष्ट्रातली दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.

अनेकांनी सांगितलं हा संपलेला पक्ष आहे, हा....जे बोलले त्यांची अवस्था काय आहे. आज महाराष्ट्राची गेल्या दोन वर्षातली राजकीय परिस्थितीत पाहत आहोत. त्यामध्ये आपण राजकारणाचा झालेला खेळ बट्याबोळ पाहत आलो आहे. पण हे सगळं पाहत असताना मला वाईट वाटत होतं. पण जेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण आणि तुझं की माझं हे ज्यावेळी चालू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.

वाचा - Raj Thackeray Rally : राणे शिवसेना सोडून गेले नसते, पण... राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story

लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा. लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेक्यांच्या घामातून उभी राहिलेली संघटना. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो.

राजकारण लहानपणापासून पाहत काय आलोय, असंख्य लोकांनी ती पक्ष आणि संघटना उभी केली आहे. मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो. इथं माझा वाद हा माझ्या विठ्ठलांशी नाही, बडव्यांशी आहे. मध्यंतरी कुणी तरी क्लिप दाखवली, ही चार टाळकी पक्ष खड्यात घालणार, याचे वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून मी बाहेर पडलो.

2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झालं, कसं झालं याचा चिखल मला करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसं कधी मनात आलं नाही, कुणाला ते पेलणार नाही, ते झेपणार नाही

मला भिंतीकडे दाबण्याचा प्रयत्न झाला, माझे फोटो बॅनरवर छापले जात नव्हते. एकेदिवशी मी त्याला गाडी घेऊन बाहेर गेलो. हॉटेल ऑबेरायला गेलो, मी समोर बसवलं त्याला...हे मी जे सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतोय....बोल तुला काय हवं आहे, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायचं. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तो हो म्हणाल.. तुला जे व्हायचं ते हो, मला सांग माझं काम काय आहे, मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांना जबाबदारी द्यायची नाही. मग पुढच्या वेळी प्रचाराला कुठल्या तोंडाने जायचं.

नारायण राणे हे शिवसेना सोडून गेले नसते. मी बाळासाहेबांना फोन केला, त्यांना जाऊ दे नका. मला त्यांनी राणेंना घरी घेऊन यायचं सांगितलं. मी नारायण रावांना फोन लावला आणि लगेच ते निघाले. मला 5 मिनिटांनी बाळासाहेबांनी फोन आला. राणेंना नका बोलवू असा निरोप आला. त्यांच्या पाठीमागे कुणी तरी बोलत होतं. मग मला राणेंना नको येऊ म्हणून सांगावं लागलं. ज्या प्रकारे राजकारण सुरू होतं.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray