मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Raj Thackeray Rally : राणे शिवसेना सोडून गेले नसते, पण... राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story

Raj Thackeray Rally : राणे शिवसेना सोडून गेले नसते, पण... राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story

नारायण राणे शिवसेना सोडून का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं

नारायण राणे शिवसेना सोडून का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी आणि नारायण राणे यांनी पक्ष का सोडला? हे सांगताना उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी आणि नारायण राणे यांनी पक्ष का सोडला? हे सांगताना उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले. नारायण राणे हे शिवसेना सोडून गेले नसते. मी बाळासाहेबांना फोन केला, त्यांना जाऊ दे नका. मला त्यांनी राणेंना घरी घेऊन यायचं सांगितलं. मी नारायण रावांना फोन लावला आणि लगेच ते निघाले. मला 5 मिनिटांनी बाळासाहेबांनी फोन आला. राणेंना नका बोलवू असा निरोप आला. त्यांच्या पाठीमागे कुणी तरी बोलत होतं. मग मला राणेंना नको येऊ म्हणून सांगावं लागलं. ज्या प्रकारे राजकारण सुरू होतं, ज्या प्रकारे लोकांचा वापर सुरू होता. त्याचा हे शेवट आहे. त्यांचं काय झालं, त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही.

'मी जे पहिल्यापासून पाहत आलोय, तेव्हा त्रास व्हायला लागला. मी शिवसेनेतून बाहेर पडले. माझी हिंमत नव्हती पक्ष काढण्याची, कोण साथ देणार, कशी साथ देणार. अशा सगळ्या परिस्थितीत लोक माझ्याकडे आली आणि मला महाराष्ट्र फिरायचा सल्ला दिला. तेव्हा फेब्रुवारी महिन्यात अनेक लोक मला सांगत होते. आज जी परिस्थिती झाली, त्यामुळे आज मला हे सांगावं लागत आहे', असं राज ठाकरे म्हणाले.

का सोडला पक्ष?

मला भिंतीकडे दाबण्याचा प्रयत्न झाला, माझे फोटो बॅनरवर छापले जात नव्हते. एकेदिवशी मी उद्धवला गाडी घेऊन बाहेर गेलो. हॉटेल ऑबेरायला गेलो, मी समोर बसवलं त्याला, हे मी जे सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतोय. बोल तुला काय हवं आहे, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायचं. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तो हो म्हणाला, तुला जे व्हायचं ते हो, मला सांग माझं काम काय आहे, मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांना जबाबदारी द्यायची नाही. मग पुढच्या वेळी प्रचाराला कुठल्या तोंडाने जायचं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

" isDesktop="true" id="853819" >

'मला काही अडचण नाही, आपलं ठरलं, आता नक्की ना. आम्ही घरी आलो. बाळासाहेब झोपलेले होते. त्यांना सांगितलं, सर्व प्रॉब्लेम सोडवला. सगळं मिटलं आहे. मला त्यांनी मिठ्ठी मारली. तिथे कुणी म्हात्रे होते, त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवायला सांगितलं. परत आम्ही शोधलं ते कुठे तरी बाहेर निघून गेले होते. हे सगळं मला बाहेर जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते', असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray