मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज ठाकरे Vs राष्ट्रवादी; पवारांवरील टीकेनंतर जयंत पाटलांनी केला पलटवार

राज ठाकरे Vs राष्ट्रवादी; पवारांवरील टीकेनंतर जयंत पाटलांनी केला पलटवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोरोना काळात आलेल्या वाढीव वीजबील माफीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. आता राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पलटवार केला आहे.

पुढे वाचा ...

अकोला, 07 फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोरोना काळात आलेल्या वाढीव वीजबील माफीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. आता राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पलटवार केला आहे. जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची (Publicity) गरज आहे, त्यामुळे ते अशाप्रकारचे निराधार आरोप करत आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देखील कान पिचक्या दिल्या. राज्यातील राजकारणाचे फासे पलटण्याच्या विधानावर त्यांनी भाष्य केलं आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जलसंपदा विभागाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा देखील घेतला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोरोना काळात दिलेल्या आश्वासनापासून देखील घूमजाव केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे निराधार वक्तव्य करीत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

हे ही वाचा-काँग्रेसच्या बॅनरवर शिवसेनेचे मातब्बर नगरसेवक झळकले, राजकीय चर्चांना उधाण

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत केलेली कामं सुमार दर्जाची आहेत. त्यामुळेच या कामाची चौकशी केली जात असल्याचंही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर राज्यातील फासे पलटवण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार देखील त्यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना गांभीर्याने घेतो. पण त्यांच्या अशा विधांना फारसं गांभीर्यानं घेत नाही. देशात कोरोना साथीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह खासगी शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी मधला मार्ग स्विकारणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एक अस्थिरता निर्माण झाली आहे. या पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र चर्चा करून निर्णय घेतील, असंही जयंत पाटीलांनी म्हटलं आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी आणि आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते.

First published:

Tags: Jayant patil, Raj raj thackeray, Sharad pawar