Home /News /mumbai /

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपत मतभेद, एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपत मतभेद, एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

Raj Thackeray Ayodhya Tour: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच रंगल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या खासदाराने विरोध केला असतानाच आता दुसऱ्या एका खासदाराने स्वागताची तयारी सुरू केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन (Ayodhya Tour) भाजपमध्येच दोन गट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. कारण भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला असातनाचा आता भाजपच्याच दुसऱ्या खासदाराने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. भाजपचे खासदार लल्लू सिंह (BJP MP Lallu Singh) यांनी राज ठाकरेंच्या अयोद्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. जो कुणी श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येईल त्याचं स्वागत आहे. हनुमानजींच्या कृपेने जर कुणी अयोध्येत श्री रामाच्या चरणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना आहे की राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी युक्ती देवो असंही खासदार लल्लू सिंह यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रीज भूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे. आधी उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्येला या, अशी आव्हान देत भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे. मनसेनं या मुद्यावर कुणालाही न बोलण्याची ताकीद दिली आहे. आता या प्रकरणाचा चेंडू देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पडला असून त्यांनी आपले स्पष्ट मतही नोंदवले आहे. वाचा : 'नवी दिशा, नवा पर्याय...', संभाजीराजेंचा भाजपला रामराम? 12 मे रोजी मोठी घोषणा 'राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रीज भूषण यांच्या विरोधाच कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत फडणवीस यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे. तसंच,' राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटलं नव्हतं. जे सरकार लांगूलचालन करतंय, ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे. राज्य सरकारविरोधात आम्ही लढतोय, राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या