जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Weather Update: पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत कधी लागणार हजेरी?

Weather Update: पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत कधी लागणार हजेरी?

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Update in Maharashtra: पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy to very heavy Rainfall alert) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट: सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळल्या (Rain in Maharashtra) आहेत. त्यानंतर आता राज्यात एक आठवडा उघडीप घेतल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy to very heavy Rainfall alert) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्यानं (IMD) बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट दिले आहेत. खरंतर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं संपूण पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भाग वळगळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भालासह मध्य महराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

जाहिरात

हेही वाचा- 47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका संबंधित अकरा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्याही राज्यात कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती राहाणार आहे. मात्र सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यांला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. तर मंगळवारी नाशिक, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहे. हेही वाचा- आता बालसुधारगृहातही कोरोनाचा शिरकाव; उल्हासनगरमध्ये 14 मुलं कोरोना Positive मुंबईत कधी लागणार हजेरी? मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसानं उसंत घेतली आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. पण मंगळवारी आणि बुधवारी  म्हणजेच 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता यापूर्वीच हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात