• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • जगण्याची जिद्द! 47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका

जगण्याची जिद्द! 47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका

बीडमधील एका 46 वर्षीय व्यक्तीनं तब्बल 122 दिवसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (फोटो -लोकमत)

बीडमधील एका 46 वर्षीय व्यक्तीनं तब्बल 122 दिवसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (फोटो -लोकमत)

बीडमधून कोरोना विरोधी लढ्याला बळ देणारी घटना समोर आली आहे. बीडमधील एका 46 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर तब्बल 122 दिवसांनी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 • Share this:
  बीड, 28 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाला कोरोना विषाणूनं ग्रासलं (Corona pandemic) आहे. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूची (Corona virus infection) लागण झाल्यानं अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. अशात बीडमधून (Beed) कोरोना विरोधी लढ्याला बळ देणारी घटना समोर आली आहे. बीडमधील एका 46 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर तब्बल 122 दिवसांनी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात (corona patient discharge after 122 days) केली आहे. अनेक वैद्यकीय गुंतागुत झाल्यानंतरही त्यानं हार न मानता कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर 122 दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रीहरी ढाकणे (Shrihari Dhakane) असं कोरोनातून बरं झालेल्या 46 वर्षीय रुग्णाचं नाव आहे. ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सारूळ येथील रहिवासी आहेत. मागील 122 दिवसांपासून ते सरकारी रुग्णालयात उपाचार घेत होते. ढाकणे यांना 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल होताना त्यांचा एचआरसीटी स्कोअर 18 होता. तर ऑक्सिजन पातळीही 33 होती. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा एचआरसीटी स्कोअर 25 वर गेला तर ऑक्सिजन पातळीही 18 वर जाऊन पोहोचली. हेही वाचा-वाह! कमाल, मुंबईत 30 हजार बेड अन् रुग्ण फक्त 500 खाटांवर त्यामुळे ढाकणे यांची अवस्था गंभीर झाली. पण डॉक्टर आणि परिचारिकांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांना 76 दिवस व्हेंटिलेटरवर आणि बायपॅपवर ठेवलं. 122 दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी ढाकणे यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणलं आहे. शुक्रवारी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. पण ढाकणे ज्यावेळी रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांचं वजन 107 किलो होतं पण कोरोनातून बरं झाल्यानंतर त्याचं वजन 47 किलोनं कमी (loss 47 kg weight) होऊन 60 किलोवर पोहोचलं होतं. कोरोना संसर्गाच्या काळात ढाकणे यांचं दिवसाला जवळास आर्धा किलो (385 ग्रॅम) वजन कमी झालं आहे. हेही वाचा-आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम एवढी शारीरिक गुंतागुंत होऊनही ढाकणे यांनी प्राणघातक कोरोना विषाणूवर मात केली आहे. सरकारी रुग्णालयात दाखल होऊनही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली आहे. अतिशय गंभीर असलेला रुग्ण 122 दिवसांनी सुखरूप घरी पोहोचतोय, हे पाहून डॉक्टरसह संपूर्ण स्टाफला देखील खूप आनंद झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: