Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता बालसुधारगृहातही कोरोनाचा शिरकाव; उल्हासनगरमध्ये 14 मुलं कोरोना Positive

आता बालसुधारगृहातही कोरोनाचा शिरकाव; उल्हासनगरमध्ये 14 मुलं कोरोना Positive

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोना प्रादुर्भाच्या काळात अनेक कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन घरी पाठवण्यात आलं होतं. यानंतर आता बालसुधारगृहात देखील कोरोना विषाणूनं शिरकाव (Corona enters in juvenile detention center) केला आहे.

उल्हासनगर, 28 ऑगस्ट: मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून संपूर्ण जगभर कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. याला भारत देशही अपवाद ठरला नाही. कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली होती. अगदी तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना देखील कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाच्या काळात अनेक कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन घरी पाठवण्यात आलं होतं. यानंतर आता बालसुधारगृहात देखील कोरोना विषाणूनं शिरकाव (Corona enters in juvenile detention center) केला आहे.

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 4 मुलं अपंग आहेत. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुलं कोरोना बाधित आढळली आहे. संबंधित सर्व कोरोनाबाधित मुलांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाबाधित सर्व मुलं 12 ते 17 वयोगटातील असल्याची माहिती बालसुधारगृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर आता बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. बालसुधार गृहातील मुलं कोरोनाबाधित आढळल्यानं महापालिका प्रशासनं सतर्क झालं आहे.

हेही वाचा-या 5 जिल्ह्यांत आहेत सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण; पुणे पहिल्या क्रमांकावर

खरंतर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या तोडांवर ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण यापूर्वीच ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येईल असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. कोरोना विषाणूचा डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंट लहान मुलांसाठीही धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलं होतं. अशात बालसुधारगृहातील मुलांना  कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.

हेही वाचा-47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका

यासोबत, राज्यातही नव्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांतही घट झाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 4 हजार 654 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 3 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या दर 97.02 टक्क्यांवर गेला आहे.

First published:

Tags: Corona spread, Ulhasnagar