मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल सेवा विस्कळीत

मुंबईत मुसळधार पाऊस; लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain Update : पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकात पाणी असल्यानं मध्ये रेल्वेची सेवा जवळपास 20 मिनिटं उशिरानं आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठावं लागत आहे. हवामान विभागानं देखील पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असतील अशी घोषणा केली आहे. शिवाय, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. रेल्वे उशिरा असल्यानं चाकरमान्यांना ऑफिसला पोहोचायला देखील उशिर होत आहे. शिवाय, रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

अध्यक्ष कोण होणार? चर्चा अंतिम टप्प्यात

धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. पण, मुंबईवरील पाणी संकट मात्र टळलेलं नाही. अद्याप देखील मुंबईला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये नाही. गेल्यावर्षी देखील कमी पाऊस झाला होता.

कोकणात मुसळधार

कोकणात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर, पावसामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सध्या मुंबई – गोवा महामार्गाचं चौपदरीकरण सुरू असल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र पाहायाला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.

SPECIAL REPORT: सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

First published: July 1, 2019, 10:06 AM IST
Tags: mumbairain

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading