मुंबई, 09 जून: आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसे ( Abhijeet Panse) यांची ओळख आहे. ते मनसेमध्ये (MNS) काही वर्षांपासून कार्यरत आहेत. नुकतीच अभिजित पानसे यांनी 100 कोटी वसूली प्रकरणातील आरोपी सचिन वाझे ( SachinVaze) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सचिन वाझे आणि अभिजीत पानसे यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिजीत पानसे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात जाऊन सचिन वाझेची भेट घेतली आणि दोघांमध्ये बराचवेळ सविस्तर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. नुकतच 100 कोटींच्या वसूली प्रकरणात सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयात केली होती. ही विनंती मान्य करत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्याचं मान्य केलं. त्यानंतर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी घेतलेल्या सचिन वाझेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अभिजीत पानसे यांची ओळख मराठीतील एक उत्तम दिग्दर्शक म्हणून आहे. असं असलं तरी अभिजीत पानसे यांनी काही वर्षांपूर्वी मनसेत प्रवेश केलाय. त्यामुळे सिनेसृष्टी आणि राजकारण अशा दोन्ही गोष्टींशी अभिजीत पानसे यांचा जवळचा संबंध आहे. अभिजीत पानसे यांच्या 'रेगे' ( Rege) हा सिनेमा प्रचंड प्रसिद्ध आहे. 'रेगे' म्हणजे अभिजीत पानसे आणि अभिजीत पानसे म्हणजे रेगे असं समीकरण आहे. रेगे या सिनेमाचं सचिन वाझे यांच्याही खास कनेक्शन आहे. ते म्हणजे सचिन वाझे यांच्याबरोबर मिळून अभिजीत पानसे यांनी रेगे हा सिनेमा केला होता. त्यामुळे आज अभिजीत पानसेंनी घेतलेल्या सचिन वाझेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा -
मी आरोपी आहे की माफीचा साक्षीदार? सचिन वाझेने कोर्टात उपस्थित केला प्रश्न
अभिजीत पानसे दिग्दर्शित 'राजबाजार' (Raanbaazaar) या वेब सीरिजची देखील सध्या सर्वत्र चर्चा आहे. योगायोगाने अभिजीत पानसे या वेब सीरिजमध्ये एका निलंबीत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. 'चारुदत्त मोकाशी' (Charudatta Mokashi) ही निलंबीत अधिकाऱ्याची भूमिका अभिजीत पानसे या सीरिजमध्ये साकारत आहेत. रानबाजारमध्ये तिसऱ्या एपिसोडमध्ये झालेल्या चारुदत्त मोकाशीच्या एंट्रीनं कथेला वेगळं वळण दिलं आहे. तर आज अभिजीत पानसे यांनी घेतलेल्या सचिन वाझेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात कोणतं वळणं येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.