जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मी आरोपी आहे की माफीचा साक्षीदार? सचिन वाझेने कोर्टात उपस्थित केला प्रश्न

मी आरोपी आहे की माफीचा साक्षीदार? सचिन वाझेने कोर्टात उपस्थित केला प्रश्न

मी आरोपी आहे की माफीचा साक्षीदार? सचिन वाझेने कोर्टात उपस्थित केला प्रश्न

मी 100 कोटी वसूली प्रकरणात आता आरोपी नसून अधिकृतपणे माफीचा साक्षीदार आहे तर मी आता नेमके काय करायचे? असा प्रश्न सचिन वाझे सतत वकिलांना विचारत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून : 100 कोटी वसूली प्रकरणी सचिन वाझेने (Sachin Vaze) केलेली माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) मान्य करताच, सीबीआयने (CBI) 24 तासाच्या आतच आरोपपत्र दाखल केले. न्यायमूर्ती डी पी शिंगाडे यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन 7 जूनला सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुख्य कोर्टात पाठवली. आता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट नंबर 48 एस एच गवलानी यांच्या कोर्टात 100 कोटी वसूली प्रकरणाचा खटला चालवला जाणार आहे. या कोर्टात पोहोचताच आरोपपत्र न्यायालयात आले असून कागदपत्रांची छाननी आणि आरोपपत्राचे वाचन सुरु असल्याने आज कोणतेही आदेश कोर्ट जारी करणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जूनला होणार, असे जाहीर केले. मात्र या दरम्यान सचिन वाझेची चुळबुळ सुरु होती. तो सतत वकीलांशी चर्चा करत होता. मी 100 कोटी वसूली प्रकरणात आता आरोपी नसून अधिकृतपणे माफीचा साक्षीदार आहे तर मी आता नेमके काय करायचे? असा प्रश्न वाझे सतत वकिलांना विचारत होता. तसेच या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? असाही प्रश्न वाझेला पडला होता. शेवटी सचिन वाझेचे वकील रौनक नाईक यांनी याबाबत कोर्टात प्रश्न उपस्थित करताच न्यायाधीश एस एच गवलानी यांनी आरोपपत्र दाखवत म्हटले की, हे आरोपपत्र पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. ( मुख्यमंत्र्यांची हिंदुत्वाची भाषा खटकते, समाजवादीच्या रईस शेख यांचं गाऱ्हाणं, राज्यसभेला साथ की पाठ? ) आरोपपत्रात सचिन वाझेला साक्षीदार नंबर 36 करण्यात आले होते. हे त्याच्या वकीलाने वाझेला सांगितले. तोच सचिन वाझेची पुन्हा हलचल सुरु झाली. कारण जर वाझे आरोपी नसून माफीचा साक्षीदार आहे हे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात CBI ने म्हटलंय तर मग वाझेने 100 कोटी वसूली प्रकरणी जायचे कुठे? असा प्रश्न त्याला पडला होता. कारण सचिन वाझे आता आरोपी नसून माफीचा साक्षीदार झालाय. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडी आपसुक रद्द होते. शिवाय आज सचिन वाझेची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यात तो आता माफीचा साक्षीदार असल्याने कोर्टात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 100 कोटी वसूली प्रकरणी सचिन वाझे माफीचा साक्षीदार ठरल्याने सीबीआयने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली नाही. मग वाझे जेलमध्ये कसा जाणार? असा प्रश्न कोर्टात उपस्थित झाला. त्यावर सचिन वाझेचे वकील रौनक नाईका यांनी कोर्टात वाझेचा जामीन अर्ज केला आणि न्यायालयाने 20 जूनची तारीख दिली. त्यामुळे वाझेच्या जामीन अर्जावर 20 जूनला सुनावणी होणार आहे. सीबीआयने सचिन वाझेच्या जामीन अर्जावर आपले म्हणणे मांडावे असे आदेश पारीत केले. मात्र एकीकडे न्यायालयाने कायद्यातील तरतूद स्पष्ट करत 100 कोटी वसूली प्रकरणी आणि माफीच्या साक्षिदार अटी प्रमाणे सचिन वाझेला जेल मध्येच रहावं लागेल, असं कोर्टाने स्पष्टही केलं. याशिवाय मुंबईच्या मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे आणि मनसुख हिरेनची हत्या करणे या प्रकरणात तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल असलेल्या स्वतंत्र गुन्ह्यांत सचिन वाझे आरोपी आहे. हे खटले पूर्ण होईपर्यंत तसेच कोर्ट जोपर्यंत जामीन देत नाही तोपर्यंत वाझेला जेलमध्येच राहावं लागणार आहे. त्यामुळे माफीचा साक्षीदार झाल्यानंतरही वाझे जेलमध्येच राहणार हे आता स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात