मुंबई, 22 मार्च : एकीकडे राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसानेही नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे, नाशिकसह अहमदनगर, सातारा आणि आतील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून पुण्यासह अनेक भागात तर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले असून वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुण्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले आहे, तर झाडांची ही पडझड झाली आहे. वादळामुळे द्राक्ष, आंबा, काढणीला आलेला गहू व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाची मात्र अवकाळी पावसाने चिंता वाढवली आहे. के.एस होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एक सेलेटाइट फोटो शेअर केला आहे.
latest satellite image indicating Pune Nashik, Ahmednagar, Satara and adjoining interiors; convective clouds persists ....
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 22, 2021
watch for @RMC_Mumbai updates pl pic.twitter.com/DqiiaoB5E1
हे ही वाचा- .तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव गेवराई वडवणी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे ज्वारी-गहू हे पिक आडवी झाली आहेत. फळ बागाही उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व झालेल्या नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी समोर येत आहे. गारपिटीमुळे गेल्या वर्षीही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.