मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

..तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

..तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

आतापर्यंत राज्यात 45 लाख जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

आतापर्यंत राज्यात 45 लाख जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

आतापर्यंत राज्यात 45 लाख जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 22 मार्च : देशभरात कोरोची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, असे असले तरी राज्यात लसीकरणावर अधिक जोर दिला जात असल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. मात्र यावेळी त्यांनी गुजरात व बंगालमधील व्यवस्थेवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी आहे, तर गुजरातमध्ये आयपीएलचे सामने सुरू आहेत. दुसरीकडे ते म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठा प्रमाणात वाढली तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी पातळीवर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढतेय त्या वेगाने तयारी करावी लागेल, राज्यात जम्बो सेंटर activate करणं गरजेचं असून जिथे जिथे स्टाफ डॉक्टर्सची कमतरता असेल तेथे ते भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा-मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? कोरोना रुग्णसंख्येने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-गेल्या काळात रुग्णसंख्या पूर्ण रोडावली होती त्यामुळे onboard घेतलेले डॉक्टर रिलिव्ह केले होते

-45 लाख जणांचं लसीकरण करून झालं आहे

-2400 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि मेडिकल कॉलेजांमध्ये लसीकरण सुरू

-खाजगी रुग्णालयांमध्ये 600 ठिकाणी लसीकरणाची परवानगी

-लशीचा साठा पडून असल्याची चुकीची माहिती सांगितली जात आहे

-राज्यात रोज तीन लाख लशी देण्यात येत आहेत

-लसीकरण आक्रमकपणे करणार

-73 टक्के चाचण्या आर टी पी सी आर टेस्ट करत आहोत

- बंगालमध्ये निवडणुका तिथे तर कुठलेच नियम पाळले जात नाही. गुजरातमध्ये क्रिकेटच्या मॅचेस सुरू तिथे ही गर्दी

First published:

Tags: Corona spread, Lockdown, महाराष्ट्र