जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / दिग्गजांना डावलत उद्धव ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना दिली राज्यसभेची उमेदवारी

दिग्गजांना डावलत उद्धव ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना दिली राज्यसभेची उमेदवारी

दिग्गजांना डावलत उद्धव ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना दिली राज्यसभेची उमेदवारी

शिवसेनेत राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 मार्च : शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना डावलून राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आल्या होत्या. त्यांचा हा प्रवेश सगळ्यांनाच धक्का देणारा होता. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड आणि दिल्लीच्या उच्चभ्रू ल्युटीयन्स वर्तुळात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांचं आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे. त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेत राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र या सगळ्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर विश्वास व्यक्त केला. भाजपमध्येही धक्कातंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नाव नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. खडसेंना पुन्हा धक्का, राज्यसभेचा पत्ता कट, या नेत्याला मिळाली उमेदवारी या आधी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आलीय. मावळते खासदार संजय काकडे यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. हे वाचा… Yes Bank नंतर आणखी एका बँकेवर RBIची टांगती तलवार? ग्राहक चिंतेत

महाराष्ट्रातल्या तरुणांचं ‘जय जवान’,  तीन वर्षात 11 हजर तरुण लष्कारत दाखल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात