खडसेंना पुन्हा धक्का, राज्यसभेचा पत्ता कट, या नेत्याला मिळाली उमेदवारी

  • Share this:
नवी दिल्ली 12 मार्च :   भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नाव नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या आधी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आलीय. मावळते खासदार संजय काकडे यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. राज्यसभेच्या 'त्या' जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी? राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. चौथ्या जागेसाठी अजूनही काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते. चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे आज फौजिया खान यांची अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राज्यसभेची गणितही बदलण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होईल. तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.
First published: