अंध असल्याने रेल्वेत मिळाली नाही नोकरी पण तिने यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

ही कहाणी आहे,उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलची. प्रांजल अंध आहे. पण तिने अशी कामगिरी केली आहे की डोळस लोकंही ती करू शकत नाही. प्रांजलने 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिचा भारतात 773 वा क्रमांक आला.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 05:10 PM IST

अंध असल्याने रेल्वेत मिळाली नाही नोकरी पण तिने यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

उल्हासनगर, 4 जुलै : ही कहाणी आहे,उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलची. प्रांजल अंध आहे. पण तिने अशी कामगिरी केली आहे की डोळस लोकंही ती करू शकत नाही. प्रांजलने 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिचा भारतात 773 वा क्रमांक आला.

प्रांजल जेव्हा सहावीत होती तेव्हा एका विद्यार्थ्याकडून चुकून तिच्या डोळ्यात पेन्सिल गेली. पण त्याच्या दुसऱ्याच वर्षी प्रांजलच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही गेली. एवढा मोठा आघात होऊनही प्रांजलने हार मानली नाही. तिने ब्रेल लिपीच्या माध्यमातून शिक्षण सुरूच ठेवलं.

रेल्वेमध्ये मिळाली नाही नोकरी

प्रांजलला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. नव्यानव्या गोष्टी जाणून घेण्याचा तिला मोठा उत्साह होता. याचा तिला आयएएस परीक्षेत खूपच फायदा झाला. प्रांजलने इंडियन रेल्वे अकाउंट्स सर्व्हिसेसची परीक्षाही उत्तीर्ण केली. यामध्ये तिचा 773 वा नंबर आला. पण ती अंध असल्यामुळे रेल्वेने तिला नोकरी नाकारली. रेल्वेच्या नियमांनुसारच तिला नोकरी नाकारण्यात आली होती.

वंचित आघाडीत उभी फूट, लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

Loading...

रेल्वेची नोकरी नाकारल्याने तिला खूप दु:ख झालं. पण ती हिंमत हरली नाही. तिने यूपीएससीचीही परीक्षा दिली आणि त्यात चांगलं यश मिळवलं. यशापेक्षाही यश मिळवण्यासाठी केलेला संघर्ष मला जास्त प्रेरणा देतो, असं प्रांजल म्हणते. पण यश मिळालं तर लोक तुमचा संघर्षही जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात,असं तिचं म्हणणं आहे.

प्रांजल दृष्टीहीन आहे पण बुद्धीच्या जोरावर आपण काम करू शकतो, असा आत्मविश्वास तिला आहे. प्रांजलची ही कहाणी अंध आणि डोळस अशा सगळ्यांसाठीच नक्कीच प्रेरणादायी आहे.

========================================================================================

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...