मुंबई, 26 नोव्हेंबर: वाढीव वीज बिलावरुन मनसेनं (MNS) गुरुवारी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha Vikas Aaghadi Sarkar) राज्यभरात 'झटका मोर्चा' काढला. त्याचबरोबर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. अशातचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी मोठा खुलासा केला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि सरकारशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली देखील अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
हेही वाचा...प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना
अशोक चव्हाण म्हणाले की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफी बाबत घोषणा करण्याच्या आधी मंत्रिमंडळातील सहकारी समवेत चर्चा करायला हवी होती. चर्चा न करता घोषणा केली. त्यामुळे समस्या झाली. राज्यात आर्थिक स्थिती बिकट त्यात वीजबिल माफी बोजा सोपा नाही. यामुळे सरकारनं वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही, असं सांगून अशोक चव्हाण यांनी नितीन राऊत यांच्यावरच नाराजी व्यक्त केली.
भाजपवर जोरदार प्रहार...
केंद्रीय एजन्सी फक्त भाजपच्या विरोधाकाच्या बाबतीत का? भाजप नेत्यांची अंडीपिळी माहिती आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. फडवणीस सत्तापासून दूर राहू शकत नसल्यानेच सरकार पडेल, असं वारंवार सांगतात. पण सरकार चार वर्ष चालेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी समन्वय अजून वाढला तर चांगले काम होईल, असंही त्यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले अशोक चव्हाण?
महाविकास आघाडी सरकारची सुरूवात, भाजपाला सत्तापासून दूर ठेवणं. त्यात कोरोनामुळे काही अडचणी ही आल्या. आरोग्य विभागास लक्ष पायाभूत सुविधा दिल्या. उत्त्पन पैकी 70 टक्के बजेट आरोग्य विभाग दिले गेले. सार्वजनिक बांधकाम निधी यंदा कमी मिळालं. मागील सरकारने देयक जास्त होती. ती दिली. त्यामुळे व्यवस्था कोलमंडली होती, आता व्यवस्था आता सुधारत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा...मुंबईत ड्रग्स पॅडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा
किती काळ सरकार टिकेल यावर बोलताना चव्हाण यांनी भाजप अपप्रचार करत आहे. भाजपचे काही नेते सत्तापासून दूर राहु शकत नाही, असा टोला त्यांनी फडवणीसांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, Maharashtra