मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्रिपदाचा राजीनामा; संजय राठोड प्रकरणात नेमकं काय काय घडलं?

पूजा चव्हाण आत्महत्या ते मंत्रिपदाचा राजीनामा; संजय राठोड प्रकरणात नेमकं काय काय घडलं?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. अखेर या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. अखेर या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. अखेर या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन अनेक आरोप करण्यात आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संजय राठोड यांच्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. पूजा चव्हाण प्रकरण आणि पोहरादेवी येथे नियमांचं उल्लंघन केल्यामुळे संजय राठोड यांना पायउतार व्हावं लागलं आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अनेक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत, अद्याप त्या व्हिडिओ क्लीपबाबत नेमका खुलासा होऊ शकलेला नाही. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण व संजय राठोड यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्याशिवाय एक व्हिडिओ क्लीपही समोर आली असून यामध्ये कथित पूजा चव्हाण व शेठ या दोघांचं संभाषण आहे.

हे ही वाचा-संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे नवीन फोटो आले समोर, चर्चांना पुन्हा उधाण

दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी संजय राठोड आरोपांनंतर पहिल्यांदा एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी यवतमाळमधील पोहरादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने संजय राठोड यांच्या समर्थकांनी हजेरी लावली. यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पोहरादेवी येथे संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. मुख्यमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून येत होते.

पूजा चव्हाण प्रकरणातील अपडेट

रविवार, 7 फेब्रुवारी- पूजा चव्हाण नावाच्या एका टिकटॉक स्टारची आत्महत्या झाल्याची बातमी समोर आली. तिने वानवडीतील हेवन पार्क सोसायटीच्या बाल्कनीतून उडी घेवून जीव दिला. त्यानंतर हे प्रकरण पाच दिवस शांत होतं.

शुक्रवारी - 12 फेब्रुवारी- वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधित काही ध्वनीफिती मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. यावरुन कळालं की, पूजाच्या आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. त्यानंतर या ध्वनीफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे आणि प्रकरण पेटत गेलं.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला होता.

12 फेब्रुवारी- भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत करत कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर प्रकरण वाढत गेलं. अनेक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला.

13 फेब्रुवारी- पूजा चव्हाण हिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की घातपात याचा नेमका खुलासा झालेला नाही.

13 फेब्रुवारी - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

13 फेब्रुवारी - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय. असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,'

13 फेब्रुवारी - पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे.

13 फेब्रुवारी- मृत पूजा चव्हाणची छोटी बहिण दिया चव्हाणचे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. 'मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.' अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

हे ही वाचा-संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोल; 'या' नेत्याची चर्चा

पोहरादेवी महंताचा विरोध

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड राजीनामा दिला आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे विनंती केली आहे. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली होती.

तसंच, जर संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असंही जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Pooja Chavan, Sanjay rathod, Shivsena