Home /News /mumbai /

Pooja Chavan case: ऑडिओ क्लीप कशा आल्या बाहेर? धक्कादायक माहिती झाली उघड

Pooja Chavan case: ऑडिओ क्लीप कशा आल्या बाहेर? धक्कादायक माहिती झाली उघड

पूजा चव्हाण प्रकरणात वारंवार हा प्रश्न विचारला जात होता, अखेर याचा उलगडा झाला आहे

मुंबई, 15 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या क्लीपवरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर आगपाखड करण्यास सुरू केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे. (Pooja Chavan case How did the audio clip come out) दरम्यान या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. त्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यूचं गूढ अधिक वाढलं आहे. हे ही वाचा-पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण, 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा दावा काल तिच्या पोस्टमार्टेममधून तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान तिच्या घरात चार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पूजा चव्हाण हिने मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी केल्यानंतर पाय घसरून किंवा चक्कर येऊन ती खाली पडल्याचं काहीचं म्हणणं आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Pooja Chavan case How did the audio clip come out) पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी करीत आहे. दुसरीकडे भाजपने मात्र या प्रकरणात अधिक कडक पावले उचलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Shivsena, Suicide

पुढील बातम्या