पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण, 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा खुलासा

पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण, 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा खुलासा

अरुणचं कुटुंब आज घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते.

  • Share this:

बीड, 15 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे.

पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. या विषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अरुण राठोडच्या घरात झाली लाखोंची चोरी

अरुणचं कुटुंब आज घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. येत्या 25 तारखेला अरुणच्या बहिणीचे होते.

लग्नाची तयारी म्हणून  म्हणून घरात सोने खरेदी केले होते असा खुलासाही या वेळी अरूणच्याआई मीराबाई यांनी केला. घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या संकटात वाढ झाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्या आहेत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचं बोललं जातंय. मात्र, अरुण हा त्याची नगर पालिकेतील नोकरी गेल्यानंतर पुण्याला गेला होता. त्याला बहिनीचे लग्न करायचे होते. त्यामुळे तो एक-एक रुपया गोळा करत होता. त्याचा यामध्ये काहीच दोष नाही. यामध्ये तो नव्हता, अशी माहिती अरुणच्या आईने दिली.

Published by: sachin Salve
First published: February 15, 2021, 4:42 PM IST

ताज्या बातम्या