जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Akola News : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक

Akola News : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक

Akola News : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक

धक्कादायक म्हणजे विद्यार्थ्यांना बनावट पावत्याही देण्यात आल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

अकोला, 18 नोव्हेंबर : कधी कुणाची आणि कशी फसवणूक होईल काहीच सांगता येत नाही. कुणी ऑनलाईन फसवणूक करतं, तर कुणी पैशांच आमिश दाखवून पैसे (Crime News) लुटतात. अकोल्यात (Akola News) मात्र शेकडो विध्यार्थ्यांची प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक (Money Fraud) करण्यात आली आहे. सध्या बेरोजगारी वाढली आहे आणि चांगल्या नोकरीसाठी उच्चशिक्षण गरजेचं आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन महाठगांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून अमरावती जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार 17 नोव्हेंबरला अकोल्यात उघडकीस आला. दरम्यान संबंधित व्यक्तीचा अकोला जीएमसीची सोबत संबंध नसल्याचे डीन यांनी स्पष्ट केल्यानंतर, या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी यासंदर्भात सांगितले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांनी अमरावती जिल्ह्यातील विविध भागात सर्व्हेच्या नावाखाली घरोघरी जावून विद्यार्थांशी संपर्क साधला. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे कर्मचारी असून तुम्हाला महाविद्यालयात एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यासाठी आवश्यक प्रोसेसिंग फी आणि प्रवेश फी म्हणून विद्यार्थ्यांकडून 1500 ते 10 हजार रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आले. हे ही वाचा- कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अद्यावत माहिती प्राप्त व्हायची. संबंधितांनी 17 नोव्हेंबरला सर्वच विद्यार्थ्यांना अकोला जीएमसीत बोलावले. ठरल्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, मात्र ज्यांनी बोलावले त्यांचाच पत्ता नव्हता. विद्यार्थ्यांकडून प्रोसेसिंग फीच्या नावावर पैसे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना संगणिकृत बनावट पावत्या देण्यात आल्या. पावतीवर ‘जीएमसी हॉस्पीटल अकोला’ असा उल्लेख असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या नावावर अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. अकोला जीएमसीत बीएससी नर्सींग अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची बतावणी करुन विद्यार्थ्यांकडून संबंधितांनी पैसे उकळले. मात्र अकोला जीएमसीत ‘बीएससी नर्सींग’ नावाचा अभ्यासक्रमच सुरू नसल्याचे अधिष्टाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी विद्यार्थ्यांशी चर्चेमध्ये स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात