मुंबई, 03 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (mumbai police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ( IPL 2022 : गिलची चूक, पण बॉलरलाच दिली खुन्नस, मैदानातल्या टशनचा Live Video ) ‘हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे’ असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे. तसंच, देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. ( कोविड XE व्हेरियंटचा भारतात शिरकाव; तूर्तास घाबरायचं कारण नाही, महाराष्ट्रात? ) त्याचबरोबर, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही’ असंही राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.