Home /News /mumbai /

बेवारस कोरोनाग्रस्त मृतांना 'मुक्ती' देणारा खाकीतला ज्ञान'देव', Covid काळातही जपला समाजसेवेचा वसा

बेवारस कोरोनाग्रस्त मृतांना 'मुक्ती' देणारा खाकीतला ज्ञान'देव', Covid काळातही जपला समाजसेवेचा वसा

पोलीस नाईक ज्ञानदेव वारे यांनी कोरोनानं मत्यू झालेल्या तब्बल 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अजूनही त्यांचं हे काम सुरुच आहे. त्यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाकाळात एका विचित्र अशा परिस्थितीला सर्वांनाच सामोरं जावं लागलं. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला धावून येत नसल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाग्रस्तांची सर्वात वाईट अवस्थातर मृत्यूनंतर झाली. अनेकांच्या अंत्यसंस्कारालाही घरचे नव्हते. अशावेळी पोलीस दलातल्या एका देवदुतानं केलेलं काम शब्दांत मांडण्या पलिकडचं आहे. पोलीस नाईक ज्ञानदेव वारे यांनी कोरोनानं मत्यू झालेल्या तब्बल 50 मृतदेहांवर (dead bodies of corona patients) अंत्यसंस्कार केले. अजूनही त्यांचं हे काम सुरुच आहे. त्यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.(Police constable performed last rites) (वाचा-माणुसकीसाठी लढतायेत अब्दुल-अहमद-अलीम-आरीफ; 802 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार) ज्ञानदेव वारे हे गेल्या 20 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करत आहेत. 50 हजारांहून अधिक मृतदेहांना त्यांनी मुक्तीचा मार्ग दाखवलाय. कोरोना काळातील परिस्थितीत पाहता त्यांनी यादरम्यानही त्यांचं हे समाजकार्य सुरुच ठेवलं. ज्ञानदेव वारे हे कोणत्याही धर्मातील व्यक्तीचा मृतदेह असेल तर त्याचा अंत्यविधी त्या धर्मातील पद्धतीनुसार अगदी विधीवत करतात. कोरोनामुळं मृत्यू झालेल्या जवळपास 50 पेक्षा अधिक मृतदेहांवर ज्ञानदेव यांनी आतापर्यंत अंत्यसंस्कार केले आहेत. (वाचा-घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास काय करावं? पाहा हा VIDEO) कोरोनाच्या पूर्वी ते हे काम करायचे तेव्हा त्यात तशी जोखीम नव्हती. पण कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाजवळ जाणं म्हणजे साक्षात मृत्युला मिठी मारल्या सारखंच आहे. पण तरीही जराही भिती न बाळगता सर्व काळजी घेऊन ज्ञानदेव वारे हे काम करतात. हॉस्पिटलच्या शवागारात जाऊन करोनानं मृत्यु झालेले मृतदेह पोलिस शववाहिणीत ठेवून ते मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जातात. विशेष म्हणजे कुटुंबीयांकडूनही वारे यांना यासाठी प्रोत्साहन मिळतं. पोलिस शिपाई ज्ञानदेव वारे यांची चिकाटी आणि करोनाकाळतही ते करत असलेलं समाजकार्य पाहून त्याचे सहकारीदेखिल त्यांनी अडेल तिथं मदत करतात. त्यांच्या याकामाचा आधीही गौरव झाला आहे. पण कोरोनाच्या काळात नाती पोरकी झालेली असताना आणि सख्खे नातलग अंतिम दर्शनालाही येत नसताना, वारे यांनी मात्र हा वसा सोडलेला नाही. त्यामुळं देव कोणी पाहिला असं जर या काळातल्या कुणाला विचारलं तर खाकीतल्या या ज्ञानदेवापेक्षा तो तरी वेगळा काय असेल, असं आपसूचक म्हटलं जाईल.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Coronavirus, Maharashtra police

पुढील बातम्या