मुंबई, 20 जुलै: पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणा (Pegasus Phone Tapping Case)वरुन संपूर्ण देशभरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतातील राजकीय नेते, पत्रकार यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं वृत्त समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. याच मुद्द्यावरुन दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament session) विरोधकांनी गदारोळ घातला आहे. तर महाराष्ट्रातही (Maharashtra) याचे पडसाद पहायला मिळत आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, सध्या कपोलकल्पित बातम्या पेरल्या जात आहेत. जाणीवपूर्वक अशा गोष्टी अधिवेशनाचे कामात व्यत्यय आणण्यासाठी केले जात आहे. ठरवून अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा बातम्या पेरल्या जातात. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार काही माध्यमांना चायनीज फंडींग केले जात आहे. असे आढळून आले आहे.
भारताला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. ४५ देशांचे या प्रकरणात नाव असताना चर्चा केवळ भारताचीच केली जात आहे. आपल्याकडे टेलिग्राफ कायदा आहे. सरकारमध्ये बेकायदेशीरपणे हॅकिंग केले जात नाही. यापूर्वीच्सा सरकारच्या काळात सुद्धा असे आरोप केले गेले होते. पण पंतप्रधान यांनी दिलेल्या उत्तरानंतर मात्र संसंदेचे काम चालत होते असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं, भारतात पत्रकार आणि अधिकारी मंत्री यांचे फोन टॅप झाले. केंद्र सरकार म्हणते अस झालं नाही. भारत सरकारने स्पष्ट सांगावे की हे सॉफ्टवेअर आम्ही खरेदी केलं आहे की नाही. सॉफ्टवेअर हॅक केलं नाही हे सरकार जर सांगत असेल तर मग सॉफ्टवेअर घेतलं का? देश विरोधी कृती करणाऱ्यांचा फोन टॅप करायला विरोध नाही. पत्रकार, न्याय व्यवस्थेत काम करणारे देश विरोधी आहेत का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Nawab malik