मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाच वेळा हँडसेट बदलूनही हँकिंग सुरुच राहिलं, ‘पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरणा’त प्रशांत किशोरांचा गौप्यस्फोट

पाच वेळा हँडसेट बदलूनही हँकिंग सुरुच राहिलं, ‘पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरणा’त प्रशांत किशोरांचा गौप्यस्फोट

भारतासह जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरणात (Pegasus phone tapping case) निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 19 जुलै : भारतासह जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरणात (Pegasus phone tapping case) निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपला फोन टॅप होतो आहे, याचा संशय (Doubt) आपल्याला आला होता. त्यासाठी आपण पाच वेळा हँडसेट (Handset) बदलला, मात्र फोन टॅपिंग (Phone Tapping) सुरूच राहिलं, असा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचे फोन टॅप झाल्याची बातमी सध्या माध्यमात गाजत असताना प्रशांत किशोर यांचंही नाव चर्चेत आलं आहे.

प्रशांत किशोर आणि फोन टॅपिंग

प्रशांत किशोर हे 2014 साली भाजपचे लोकसभा निवडणुकीतील रणनितीकार होते. भाजपच्या घवघवीत यशानंतर त्यांनी इतर पक्षांसोबत काम करायला सुरुवात केली. त्यांनी काम केलेले बहुतांश पक्ष हे भाजपचे विरोधी पक्ष असल्यामुळे आपला फोन टॅप होत असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केल्याची बातमी NDTVनं दिली आहे. प्रशांत किशोर यांचा फोन अद्यापही टॅप होत असल्याचं लक्षात आलं असून काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 जुलै या दिवशीदेखील त्यांचा फोन टॅप झाल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे वाचा - नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; या तारखेापासून आठवड्यात 4 दिवसच करावं लागणार काम?

अनेक दिग्गजांची नावे

जगातील विविध देशांमधील 16 वृत्तसमूहांनी एकत्र येत केलेल्या या गौप्यस्फोटात भारतातील अनेक नेत्यांची, पत्रकारांची, वकिलांची, मंत्र्यांची आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचीदेखील नावंदेखील समोर आली आहेत. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही फोन टॅप झाल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेस याप्रकरणी आक्रमक झाली आहे. तर सध्या माहिती तंत्रज्ञान खातं ज्यांच्याकडे आहे, त्या कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांचा फोनदेखील टॅप करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा फोन टॅप झाला, त्यावेळी ते भाजपात नव्हते, अशीदेखील माहिती समोर येत आहे.

First published:

Tags: BJP, Congress, Israel