.....आणि दोन लेकरांसमोर 'तो' ढसाढसा रडला

.....आणि दोन लेकरांसमोर 'तो' ढसाढसा रडला

मला घरी जायचंय, पैसा आहे म्हणून मुंबईत अडकून पडू का? इतर राज्यातल्या मजुरांना बसने पाठवले जात आहे, रेल्वेने पाठवले जात आहे. अहो, पण राज्यातल्या आमच्यासारख्या लोकांचं काय?

  • Share this:

मुंबई, 26 मे : केंद्र सरकारच्या सुचनेनंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. परंतु, विमानाने वेळापत्रक आणि अनेक फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना फटका बसला आहे. मुंबईत दोन महिन्यांपासून अडकलेले ईश्वर हराळकर यांना फ्लाईट रद्द झाल्यामुळे विमानतळावरच रडू फुटले.

ईश्वर हराळकर हे गेले दोन महिने लॉकडाउनमुळे मुंबईत अडकून पडले होते. सोमवारी त्यांना नांदेडला जायचं आहे.  ईश्वर यांना दोन मुलं आहेत. आपल्या दोन मुलांसह आपल्या पत्नीकडे परत जाता येईल या आनंदाने त्यांनी विमानाचे तिकीट काढलं आणि त्याच लगबगीने ते मुंबई विमानतळावर दाखल झाले.  पण सुरक्षारक्षकाने फ्लाईट नंबर पाहून आज तुमचं फ्लाईट रद्द झाली आहे आणि कधी उड्डाण भरेल हे माहीत नाही, असं सांगितलं.

हेही वाचा - कोरोना रुग्ण वाऱ्यावर तर कर्मचारी आंदोलनावर, मुंबईतल्या केईएममधला गंभीर प्रकार

हे ऐकून ईश्वर हराळकर यांच्या बांध सुटला. दोन्ही लेकरांसमोर त्यांना अश्रू अनावर झाले. 'माझं पण घर आहे, माझं पण कुटुंब आहे, पैसा आहे म्हणून मी काय बिस्कीट आणि चिवडा खाऊन जगू?  मला घरी जायचंय, पैसा आहे म्हणून मुंबईत अडकून पडू का?  इतर राज्यातल्या मजुरांना बसने पाठवले जात आहे, रेल्वेने पाठवले जात आहे. विमानांची  खास व्यवस्था केली जात आहे.  अहो, पण राज्यातल्या आमच्यासारख्या लोकांचं काय? जे मुंबईत अडकून पडलेत?' असा सवाल ईश्वर हराळकर यांनी उपस्थितीत करत अश्रूना वाट मोकळी करून दिली. राज्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. अशात फ्लाइट्सचा अनेकांना दिलासा होता आणि तोही आज संपला.

देशांतर्गत विमान वाहतुकीला सुरुवात झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत एकूण 47 विमानांची वाहतूक झाली. पैकी 3455 लोकं मुंबईतून बाहेर इतर राज्यात गेले तर मुंबईत 1100 प्रवासी उतरले. महाराष्ट्र सरकारने नागरी उड्डयन मंत्रालयाला कळवल्यायाप्रमाणे राज्यांतर्गत विमान वाहतूक सेवा ही जरी सुरू असली मुंबईतून महाराष्ट्रातील इतर शहरात होणारी वाहतूक सेवा मात्र, पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.अवघ्या 25 फ्लाईट लँड होतील आणि 25 फ्लाईट उड्डाण भरण्याची महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली. आणि त्यानंतर मात्र, आज अनेक फ्लाईट रद्द करून अनेकांना परत पाठवण्यात आलं.

अनेकांनी तिकीटं काढली होती पण जर फ्लाईट रद्द होणार असतील तर त्यांना साधं विमान वाहतूक कंपन्यांनी कळवण्याची तसदीही घेतली नव्हती. त्यामुळे मुलाबाळांसह आलेली सगळी मंडळी विमानतळावर थांबून होती की, कदाचित त्यांचा फ्लाईट आज उशिरा का होईना पण उड्डाण भरेल. प्रवासी कल्याण, ठाणे सारख्या ठिकाणाहून अंधेरीत पोहोचले. इतकंच काय तर खूप कमी अंतरासाठी टॅक्सीसाठी 1200  ते 2000 रुपये मोजत ही मंडळी विमानतळावर पोहोचली होती.

हेही वाचा - श्रमिक ट्रेनमध्ये तापानं कापत होतं 10 महिन्यांचं बाळ, स्टेशनवर डॉक्टर शोधले पण..

मुंबईहून हैदराबादला जाणारी एक महिला आपली 2 लहान मुलं आणि सासरे असे चौघे जण शिवडीहून टॅक्सीला 800 रुपये मोजून सकाळीच  साडेसात वाजता विमानतळावर पोहोचले. पण एअर एशियाचं त्यांचं विमान रद्द झालं. म्हणजे तारेवरची कसरत करत इथे आलेल्या या कुटुंबाला नुसता मानसिक ताप नाही तर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. कारण,  हैदराबादहुन आंध्रप्रदेशला जाण्यासाठी त्यांनी एक एक गाडी बूक केली होती. जी हैदराबाद विमानतळावर उभी हाती आणि ज्याचे 10 हजार रुपये त्यांनी मोजले होते, तेही वाया गेले. एअर एशियाने त्यांना कळवलं असतं तर ते पैसे त्यांना बुकिंग पुढे ढकलून रद्द करता आले असते.

महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मुद्दा जर कोणता असेल तर तो आहे की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक प्रवासी वेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी जायचं आहे. पण, त्यांना त्यांना जाता येत नाही. त्यामुळे परराज्यात जाणारे मजूर विरुद्ध जिल्हांतर्गत स्थलांतरित होणारे नागरिक असा वाद पुढे उदयाला येतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 26, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading