मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंडे समर्थकांची मुंबईत बैठक; पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार?

मुंडे समर्थकांची मुंबईत बैठक; पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार?

Pankaja Munde: मुंडे समर्थकांचे राजीनामे सत्र सुरू असताना दिल्लीला दाखल झालेल्या पंकजा मुंडे आता मुंबईत परतल्या असून निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत.

Pankaja Munde: मुंडे समर्थकांचे राजीनामे सत्र सुरू असताना दिल्लीला दाखल झालेल्या पंकजा मुंडे आता मुंबईत परतल्या असून निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत.

Pankaja Munde: मुंडे समर्थकांचे राजीनामे सत्र सुरू असताना दिल्लीला दाखल झालेल्या पंकजा मुंडे आता मुंबईत परतल्या असून निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 13 जुलै: बीडच्या भाजपा खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) स्थान मिळाले नाही. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे बीडमधील मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल दीडशे भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. एकता वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायती च्या सरपंचांनी राजीनामे दिले आहेत यामुळे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या समोरचं आव्हान आहे. दिल्लीमधील पक्ष श्रेष्ठीच्या भेटीनंतर पंकजा मुंडे नाराज कार्यकर्त्यांची आज मुंबईमध्ये निवासस्थानी बैठक (Munde supporters meeting in Mumbai) घेत आहेत.

दिल्लीवरुन मुंबईत आलेल्या पंकजा मुंडे आज आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून निवडक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले लावले जात आहेत.

मुंडे समर्थकांनी मुंबईत एका बैठकीचं आयोजन केलं आहे. ही बैठक मंगळवार 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबईतील वरळी भागात होणार आहे. या बैठकीच्या संदर्भातील बॅनर्सही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्यावर चलो मुंबईचा नारा देण्यात आला आहे. तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटोही आहे.

कडक सॅल्यूट! छातीभर पाण्यात उतरून महावितरण कर्मचाऱ्याचे कार्य; धाडसाचं सर्वत्र कौतुक, पाहा VIDEO

पंकजा मुंडेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

असं म्हटलं जात आहे की, मुंडे समर्थकांनी आयोजित केलेल्या या बैठकीत पंकजा मुंडे भाषण करणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या बैठकीत काय भाष्य करतात, तसेच काय निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

पंकजा मुंडेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दिल्लीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची दोन दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे दाखल झाले होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक जबाबदारी आदी विषयावर विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे राज्यात राजीनामा सत्र सुरू असून मोदींसोबतच्या बैठकीत पंकजा मुंडे यांची काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.

First published:

Tags: Pankaja munde