मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कडक सॅल्यूट! छातीभर पाण्यात उतरून महावितरण कर्मचाऱ्याचे कार्य; धाडसाचं सर्वत्र कौतुक, पाहा VIDEO

कडक सॅल्यूट! छातीभर पाण्यात उतरून महावितरण कर्मचाऱ्याचे कार्य; धाडसाचं सर्वत्र कौतुक, पाहा VIDEO

महावितरणच्या कर्मचाऱ्याने पूरपरिस्थितीत केलेल्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्याने पूरपरिस्थितीत केलेल्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्याने पूरपरिस्थितीत केलेल्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.

  • Published by:  Sunil Desale

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 13 जुलै : महावितरणच्या (Mahavitaran) कामावरून अनेक नागरिक नेहमीच टीका करत असतात. वीज प्रवाह (Electricity Supply) खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते. पण त्यांचं काम किती अवघड असतं, कधी कधी जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत ज्यावरून त्याचा थोडा अंदाज येईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या (Ratnagiri district) राजापूर तालुक्यातील मोसम या गावात (Mosam Village, Rajapur) पूर आला होता. मात्र तिथल्या एका खांबावर पुढील गावाचा वीज पुरवठा अवलंबून होता. त्यामुळे छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन तिथल्या रुपेश महाडिक (Rupesh Mahadik) या कर्मचाऱ्याने त्या खांबावरचा खटका सुरु केला.

वीज पुरवठा थोडा वेळ खंडित झाला तरी आपण बोटे मोडायला सुरूवात करतो. काही ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाणही होते. पण त्यांचे काम किती जिकरीचे आहे, याचा अंदाजही आपल्याला येत नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video goes viral) होत असून सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे.

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जिल्ह्याला 16 तारखेपर्यंत RED ALERT

" isDesktop="true" id="578576" >

राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला आहे. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला आहे. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित खंडित करुन काम सुरू होते. मात्र सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे. त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढले आहे. मात्र तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू करुन पुढची गावे प्रकाशमान केली. हा प्रकार पाहिल्यानंतर तरी महावितरणच्या कर्मचार्यांना शिव्या देताना विचार करायला हवा.

First published:

Tags: Ratnagiri