Home /News /mumbai /

आपले mission एकच, पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस मंत्र्याचे आभार

आपले mission एकच, पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस मंत्र्याचे आभार

पंकजा मुंडे (pankaja munde birthday ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातील भाजपचे आणि इतर पक्षातील नेत्यांनी....

    मुंबई, 26 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (modi government cabinet reshuffle) नुकताच पार पडला. या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे  (pankaja munde) अजूनही नाराज आहे, असं दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांना आपलं एकच मिशन आहे, आरक्षण बचाओ, असं म्हणत आभार मानले आहे. त्याचं झालं असं की, पंकजा मुंडे (pankaja munde birthday ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातील भाजपचे आणि इतर पक्षातील नेत्यांनी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ट्वीट करून 'माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा' अशा शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी रिट्वीट करून विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले. यावेळी, पंकजा मुंडे म्हणाल्या की, Thanks a lot आपले mission एकच आहे आरक्षण बचाओ'. पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपला लढा एकच असल्याचे या ट्वीटमधून सुचवले आहे. विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणासाठी लोणावळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची परिषद भरवली होती. या परिषदेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावल्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होता, अशी चर्चा रंगली होती. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल खंत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. आता मात्र, पंकजा यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांसोबत एकत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Army Recruitment: ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट कामठी इथे नोकरीची संधी; तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या मतभेद असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र ट्वीट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज फडणवीस यांनी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ट्वीट करून पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. विशेष म्हणजे, पंकजा यांनीही 'Thank you Devenji' असं म्हणत आभार मानले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या