मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

OBC Reservation: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनात शरद पवारांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे.

मुंबई, 25 मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) आज राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी करत शरद पवारांनी थेट मोदी सरकारला (Modi Government) आव्हान दिलं आहे.

शरद पवार म्हणाले, अनेकजण म्हणतात की यांची नक्की लोकसंख्या किती?, इतकी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंका उपस्थित करतात. आजच्या परिषदेत एक ठराव मान्य केला तो म्हणजे, केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा करुनच टाका आणि कळून जाऊ द्या देशाला की नक्की किती लोकसंख्या आहे आणि त्यासंख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथं कुणी फुकट मागत नाही. जो अधिकार आहे न्यायाचा तो अधिकार मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही.

शरद पवारांनी पुढे म्हटलं, तुमच्याही वाचनात आलं असेल की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. भाजप हे त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांना सांगितलं आम्हाला जातीनिहाय जनगणना हवी आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांच्याकडून जातीनिहाय जनगणना होईल असं वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्य सराकरमधील एक घटक म्हणून आग्रहाने भूमिका घेत आहे आणि त्या भूमिकेला सरकारमधून दोन्ही पक्षांचं सहकार्य आहे. आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या प्रत्येक निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, मध्यप्रदेश सरकार आणि आपण एकत्रित काहीतरी निर्णय घ्यावा. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले. कुणा-कुणाला भेटले? पण दोन दिवसांत असं काय मध्यप्रदेशच्या सरकारने केलं? आणि दिल्लीत कुणाची मिटिंग झाली की त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्यप्रदेशची जी ऑर्डर आहे ती फायनल ऑर्डर नाहीये. त्यामुळे भाजप जे सांगत आहे की, मध्यप्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही यामध्येही खोटेपणा आहे.

First published:

Tags: NCP, Reservation, Sharad Pawar (Politician)