मुंबई 13 ऑक्टोबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मंगळवारीही हीच घट कायम होती. दिवसभरात 15 हजार 353 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आजपर्यंत एकूण 12,97, 252 बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.3 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज 8522 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आलं. तर 187 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 77,62, 005 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15,43, 837 (19.89 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23,37,899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,857 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आता उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. सर्व मोठा उत्सव पुढच्या दोन महिन्यांमध्येच आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये मंदिरं उघडण्याची मागणी जोर धरते आहे. अशात आता देशातील कोरोनाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे.
कोरोना नियंत्रणात मेड इन इंडिया App अव्वल; WHO नेदेखील केलं भारताचं कौतुक
देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत. यामध्ये सर्वात जास्त 25.38% महाराष्ट्रात आहेत. तर केरळमध्ये हे प्रमाण 11.26% आहे. आता केरळपाठोपाठ कर्नाटकातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तरी नव्या रुग्णांच्या बाबतीत आता कर्नाटकाने महाराष्ट्राला मागे टाकलं आहे. कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षाही जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 7,089 तर कर्नाटकात 7,606 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांचा खिसा होणार खाली, दंडाच्या रक्कमेत दुप्पट वाढ
महाराष्ट्रात तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र तरी गणेशोत्सवानंतर राज्यात प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus