मुंबई, 13 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचं कौतुक जागतिक स्तरावरही केलं जातं आहे. आधी धारावी मॉडेल आणि आता भारताच्या आरोग्य सेतू अॅपचं (Arogya Setu App) जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कौतुक केलं आहे. हे मेड इन इंडिया अॅप कोरोना नियंत्रणात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं आहे, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.
भारतात एप्रिल 2020 रोजी भारतानाने आरोग्य सेतू अॅप लाँच केलं आहे. देशातील कोरोना संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रणासाठी आणि अलर्टसाठी भारत सरकारने हे अॅप आणलं. देशातील कोट्यवधी लोक हे अॅप वापरत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) या अॅपचं महत्त्व सांगितलं आहे.
Aarogya Setu app from India has been downloaded by 150 million users, and has helped city public health departments to identify areas where clusters could be anticipated & expand testing in a targeted way: Tedros Adhanom Ghebreyesus, Director-General, WHO #COVID19 pic.twitter.com/TR31ARQsu2
— ANI (@ANI) October 13, 2020
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदनोम घेब्रेयिसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं, भारताचं आरोग्य सेतू अॅप 150 मिलियनपेक्षा अधिक युझर्सनी डाऊनलोड केलं आहे. या अॅपच्या मदतीने आरोग्य विभागाला शहरातील हॉटस्पॉट ओळखणं आणि वेळेत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडता आली.
हे वाचा - कोरोना लशीसाठी भारत सज्ज; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कधी देणार लस
केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक केला आहे. हे अॅप मोफत डाऊनलोड होतं. युझर्सला सर्वात आधी स्वत:चा मूल्यांकन करावं लागतं. हे अॅप ब्ल्यूटूथ आणि जीपीएसमार्फत कोरोना संक्रमित रुग्ण किंवा संशयित कोरोना संक्रमिताच्या ठिकाणाची माहिती देतं. तुमच्यापासून 500 मीटर अंतरावर किती कोरोना रुग्ण आहेत याची माहिती तुम्हाला मिळते. यामुळे कोरोना रुग्णांची ट्रेसिंग करायलाही मदत होते.
हे वाचा - कोरोना लशीसाठी भारत सज्ज; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कधी देणार लस
याआधी WHO ने धारावी मॉडेलचंही कौतुक केलं होतं. धारावीतील घरांची रचना, गल्ली, लहान घरांमुळे सोशल डिस्टन्सिंग करणे अवघड जाते. त्यामुळे सुरुवातीपासून येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केला जात होता. त्यात सुरुवातीच्या दिवसात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र ही रुग्णसंख्या नंतर अत्यंत कमी झाली आहे. यामागे धारावीचे कोरोना मॉडेल फायदेशीर ठरले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी WHO कडून धारावी मॉडेलचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus