मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'आता भाजप नेत्याची फाईल ओपन करा', नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?

'आता भाजप नेत्याची फाईल ओपन करा', नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?

अनंत गितेंच्या 'त्या' वक्तव्याचं नाना पटोलेंनी केलं समर्थन

अनंत गितेंच्या 'त्या' वक्तव्याचं नाना पटोलेंनी केलं समर्थन

'किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं'

मुंबई,  20 सप्टेंबर : भाजपचे (bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्री आणि आमदारांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी त्यांच्या फाईली ओपन करा, अशी आक्रमक भूमिकाच काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी घेतली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल. यात कोणतीची शंका आमच्या मनात नाही. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हे काय? दिराने पाठवली अशी लग्नपत्रिका; मजकूर वाचून वहिनीच्या रागाचा चढला पारा

'रविवारी अनंत चतुर्दशी असताना स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. माध्यमं असो, उद्योगपती असो किंवा राजकीय नेते यांवर आरोप करुन ब्लॅकमेल करण्याचं काम भाजप करतोय. कारण तसा अधिकारच केंद्रातील ब्लॅकमेलिंग सरकारने त्यांना दिला आहे' अशी टीकाही पटोले यांनी केली.

'आम्हाला भाजपच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलही भीती नाही. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातोय, हे सारा देश बघतोय. त्यामुळे कोणीतरी ओरडावं आणि आपण त्याकडे लक्ष द्यावं असं करण्याची काहीच गरज नाही. कारण कर नाही त्याला डर कशाला' असंही पटोले म्हणाले.

येत्या 3 दिवसांत मुंबईसह पुण्यात वरुणराजा बरसणार; आज 15जिल्ह्यांना IMDकडून इशारा

'a मगच त्यांना खऱ्याअर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल' असा टोलाही पटोले यांनी सोमय्यांना लगावला.

'महाराष्ट्राच्या निर्मितीला आता ६० वर्ष झाली. निर्मितीपासून ते त्याला आघाडीचे राज्य बनवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. या ६० वर्षात केलेली कामं आणि भविष्यात महाराष्ट्रात कसा घडवायचा आहे याचा कार्यक्रम घेऊन लवकरच आम्ही गावागावांपर्यंत जाणार आहोत.

राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार आज संध्याकाळी जाहीर केला जाईल' असंही पटोले यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil, Nana Patole