मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता, भाजपकडून स्पष्ट; राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक

युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता, भाजपकडून स्पष्ट; राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक

Chandrakant Patil meet Raj Thackeray: चंद्रकांत पाटील  यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली.

Chandrakant Patil meet Raj Thackeray: चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली.

Chandrakant Patil meet Raj Thackeray: चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 06 ऑगस्ट: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp State president chandrakant patil) यांनी आज कृष्णकुंजवर जात मनसे प्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील असे कुठलेच विचार आता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाषण मी ऐकलं तरी काही शंका होत्या त्या दूर करण्यासाठी आलो होतो, असं ते म्हणालेत. दोन भूमिका असतात. माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं होतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनसे-भाजप युतीचा कसलाही प्रस्ताव नाही. नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंशी अनपेक्षित भेट झाली होती. त्यांनी निवासस्थानी घेऊन भेटण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती, असंही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. जेव्हा ते बोलतात त्यात उत्तर भारतीयांना कटुता असल्यासारखे वाटते त्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.

भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज रात्री दिल्लीसाठी रवाना होत आहेत. चंद्रकांत पाटील यांचा हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या विविध नेत्यांच्या भेटी ते घेणार आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे भाजप खासदारांची त्यांची चर्चा होईल.

डिग्री न घेता मी सुद्धा 50 टक्के डॉक्टर झालोय, आमदार निलेश लंकेंचं वक्तव्य

पुढील ४ दिवस महाराष्ट्रातील संघटनात्मक स्थिती आढावा चंद्रकांत पाटील केंद्रातील प्रमुख भाजपा नेत्यांना देणार आहेत. राज ठाकरे यांची झालेली भेट आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांची दिल्लीवारी यातून काही नवे समीकरण चर्चेला येतात का हे बघावे लागेल.

राज ठाकरेंचा पुणे दौरा

चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर आज राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आज 4 वाजता मुलाखती घेणार आहेत.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, MNS, Raj raj thackeray, Raj Thackeray