मुंबई, 07 जानेवारी: मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा (Corona Virus) आजचा आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सद्यपरिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन (Complete Lockdown) करण्याचा कोणताही विचार नाही आहे. पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
दरम्यान मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन नाही तर मिनी लॉकडाऊन करण्याची सध्या चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच गंभीर रुग्णांसाठी 22 हजारांचे बेड्स राखीव ठेवले असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले आहेत. सद्याच्या परिस्थितीत बाधित असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. सध्या रुग्णालयात 1 हजार 170 रुग्ण आहेत. 16.8 टक्के इतका पॅाझिटिव्ह रेट आहे. पुरेसे बेड उपलब्ध आहेत, असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- Corona चा उद्रेक..! 7 महिन्यांनंतर देशातला रुग्णांचा आकडा 1 लाखांवर
रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध वाढवावे लागतील. घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन महापौरांनी यावेळी केलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या संकटापासून जनतेला कसे वाचवता येईल याचाच विचार करत आहेत. याकरिता ते सतत तज्ज्ञांशी तसंच अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही असं सांगत काही नागरिक बेजबाबदारपणे वागत राहिले तर संकटाला तोंड द्यावं लागणार असल्याचं त्या म्हणाल्यात. असं झाल्यास निर्बंधात वाढ करावी लागले असेही महापौर यांनी म्हटलं आहे. सध्या डॉक्टर, बेस्ट कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण होत आहे. सध्या बेड्स रिकामे आहेत, त्यामुळे काही निर्णय घेत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kishori pedanekar, Lockdown, Mumbai