जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / रुग्णालयात बेड उपलब्ध नाही; घरी येऊन डॉक्टर कोरोना रुग्णांवर करणार उपचार

रुग्णालयात बेड उपलब्ध नाही; घरी येऊन डॉक्टर कोरोना रुग्णांवर करणार उपचार

देशात सध्या 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात सध्या 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधितांना (corona patient) दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयातही बेड (hospital bed) उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभरात अक्षरशः थैमान घातले असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोनाबाधितांना (corona patient) दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयातही बेड (hospital bed) उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. बऱ्याचदा खाटांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागते. वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावतात. हेच लक्षात घेत राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण कमी करण्यासाठी आता अतिसौम्य लक्षणे असलेल्या किंवा कुठलीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइन करण्यात येत आहे आणि त्यांना घरीच उपचार दिले जात आहे. मात्र आता हे उपचार करण्यासाठी डॉक्टरही या रुग्णांच्या घरी येणार आहेत. मुंबईतील एका रुग्णालयातील डॉक्टर कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना उपचार देणार आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यात दिसणाऱ्या लक्षणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. रुग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतो हे पाहिलं जाईल. त्याला रुग्णालयात दाखल करायची गरज नाही याची खात्री झाल्यानंतर होम केअर सेवा पुरवली जाईल. त्यानंतर त्यांना घरातच योग्यपद्धतीने उपचार दिले जाणार आहेत. डॉक्टर, नर्स दररोज या रुग्णाच्या आरोग्याची तपासणी करतील, शिवाय व्हिडीओ कॉलमार्फतही कोरोना रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. हे वाचा -  ‘Engagement आहे मुंबईला जायचंय’ तरुणीचं Tweet; पुणे पोलिसांनी दिलं स्पेशल गिफ्ट कोरोना रुग्णांना होम केअर सेवा देण्यासाठी मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाने Pioneering tertiary care hospital’s कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात नावनोंदणी केल्यावर रूग्णाला होम मॉनिटरिंग किट दिली जाईल, ज्यामध्ये डिजिटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर, हातमोजे, सॅनिटायझर, मास्क आणि रेकॉर्डिंग शीटचा समावेश आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ग्लोबल रूग्णालयाचे प्रकल्प संचालक आणि इन्फेक्शन कंट्रोल अॅडव्हायझरी बोर्डचे चेअरमन डॉ. सुब्रमण्यम स्वामीनाथन म्हणाले की, “कोरोना पॉझिटिव्ह असणारे अनेक रुग्ण रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेऊन बरे होणं पसंत करत आहेत. अशा रुग्णांसाठी त्यांच्या इच्छेनुसार आता घरच्या घरी वैद्यकीय उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी होम केअर सेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी डॉक्टर आणि नर्सेस रुग्णांवर त्यांच्या घरी उपचार करताना सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगत आहेत. 14  दिवस हे वैद्यकीय उपचार सुविधा दिली जाणार आहे. दररोज पाठपुरावा आणि रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबाबत या प्रोग्रामद्वारे नातेवाईकांना सूचित केले जाईल” हे वाचा -  कोरोना योद्धांसाठी महापालिकेने हे योग्य केलं, आजपासून उपक्रमाला सुरुवात इंडिया ऑपरेशन्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम विजयकुमार म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची जबाबदारी समजून त्यांची काळजी घेत आहोत. या नव्या उपक्रमाद्वारे दररोज रुग्णांची देखरेख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देत आहोत.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात