कोरोना योद्धांसाठी महापालिकेने हे योग्य केलं, आजपासून उपक्रमाला सुरुवात

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कोविड 19 अर्थात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कोविड 19 अर्थात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करत आहे.

  • Share this:
मुंबई, 24 जुलै : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठी मागील चार महिन्‍यांपासून संपूर्ण शासकीय, निम-शासकीय यंत्रणांसह सर्वजण एकत्रित प्रयत्‍न करत आहेत. विशेषतः यामध्‍ये सर्वांत आघाडीवर असलेल्‍या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची (फ्रन्‍टलाईन वॉरियर्स) कोरोना चाचणी करण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यामध्‍ये प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कार्यरत आरोग्‍य, स्‍वच्‍छता, मलनिःसारण यासह विविध खात्‍यातील कोविड 19 विषयक कर्तव्‍य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच बंदोबस्‍तात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याची देखील ‘ॲण्‍टीजेन कीट’ द्वारे चाचणी केली जाणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने आजपासून या उपक्रमास आरंभ केला आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कोविड 19 अर्थात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करत आहे. यामध्‍ये प्रमुख व उपनगरीय रुग्‍णालयांसह संपूर्ण मुंबईभर असलेली विविध आरोग्‍य केंद्र, दवाखाने, आरोग्‍य स्‍वयंसेवक, इतर आजारांच्‍या प्रतिबंधासाठी राबणारे आरोग्‍य कर्मचारी, घनकचरा व्‍यवस्‍थापन खाते अंतर्गत कार्यरत स्‍वच्‍छता कर्मचारी, झोपडपट्टीतील स्‍वच्‍छतेसाठी कार्य करणाऱ्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालक संस्‍थांचे कार्यकर्ते, मलनिःसारण व तत्‍सम कामकाज करणारे कर्मचारी यांच्‍यासह ज्‍या-ज्‍या खात्‍यांद्वारे प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कामकाज केले जात आहे, त्‍यांचे कर्मचारीवृंद या सर्वांचा यामध्‍ये समावेश असेल. पुण्यात 4 फुटी गणेशमूर्तींचा वाद अखेर निकाली, महापौरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय महालक्ष्मी मंदिरासमोर तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ महानगरपालिका प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक कामकाजामध्ये सक्रिय सहभाग देणाऱया बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांचीदेखील चाचणी करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रतिबंधात्‍मक क्षेत्र, कोरोना आरोग्‍य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्‍ताच्‍या कर्तव्‍यावर देखील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कार्यरत अशा पोलिस कर्मचाऱयांचीही ‘ॲण्‍टीजेन कीट’ द्वारे कोविड चाचणी केली जाणार आहे. कोरोनात आरोग्याशी असा खेळ! कोल्हापूरच्या अलगीकरण केंद्रातील जेवणात सापडल्या... भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्र व राज्‍य सरकार आदींनी निश्चित करुन दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वांनुसार या चाचण्‍या केल्‍या जाणार आहेत. महानगरपालिकेच्‍या सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांच्‍या हद्दीत स्‍थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करुन तसेच सुरक्षित अंत राखण्‍यासह सर्व मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे पालन करुन या चाचण्‍या केल्‍या जाणार आहेत. आजपासून त्‍याचा प्रारंभ झाला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: