नितेश राणेंनी समोर आणला सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO, वार्डात मृतदेहच मृतदेह!

नितेश राणेंनी समोर आणला सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO, वार्डात मृतदेहच मृतदेह!

हॉस्पिटल प्रशासनाकडून अशी व्यवस्था केली जात आहे का? असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. परंतु, दुसरीकडे विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. अशातच आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातला  धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमधील भीषण परिस्थिती समोर आली आहे.

हॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये रुग्ण उपचार घेत आहे. या वार्डात मोठ्या संख्येनं रुग्ण दिसून येत आहे. एकीकडे रुग्ण उपचार घेत आहे तर तिथेच एका खाटेवर मृतदेह बांधून ठेवण्यात आले आहे. तर आणखीही मृतदेह हे याच वार्डमध्ये स्ट्रेचरवर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता!आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट?

हॉस्पिटल प्रशासनाकडून अशी व्यवस्था केली जात आहे का? असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेवर टीका केली आहे.

परंतु, हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुणी रेकॉर्ड केला, याबद्दल नितेश राणे यांनी कोणतीही माहिती दिली.

सायन हॉस्पिटलकडूनही या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

First published: May 7, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading