मुंबई, 20 मार्च : मुंबईत (Mumbai) स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) कार मायकल रोड (Mumbai Carmichael Road) घटनास्थळावर घेऊन गेले होते. नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली होती याचे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे.
ज्या दिवशी स्फोटकं ठेवण्यात आली होती त्याच रात्री पीपीई कीट (PPE kit) घातलेली एक व्यक्ती कार मायकल रोडवरुन फेरफटका मारत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना घेऊन शुक्रवारी रात्री घटनास्थळावर नाट्यरुपांतर केलं. सचिन वाझे यांना एक पीपीई कीट सारखे जॅकेट घालण्यात आले होते. त्यांना स्फोटकांनी कार ठेवलेल्या ठिकाणावर चालण्यात सांगण्यात आले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
सचिन वाझे यांनी घटनास्थळी नेऊन करण्यात आलं नाट्यरुपांतर pic.twitter.com/nIDYxRGlh5
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2021
कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती ही सचिन वाझे असावेत असा संशय NIA ला आहे. त्यामुळे या घटनेचा तपास करण्याकरता सचिन वाझे यांना त्याच मायकल रोडवर, त्याच ठिकाणी त्याच वेळेत. तशाच पद्धतीने पीपीई कीट घालून चालण्यास सांगणार आले. जेणेकरून सचिन वाझे यांची चालण्याची पद्धत आणि पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत एकच आहे का? हे तपासले जाणार आहे.
रेकीसाठी वापरली मर्सिडीज कार
दरम्यान, 24 फेब्रुवारीला कारमायकल रोडवर जेव्हा हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जिलेटीनसह सापडली. ही गाडी तिथे उभी करण्यापूर्वी तब्बल 15 ते 20 दिवसांपूर्वी सचिन वाझे यांनी याच काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंझ मधून कारमायकल रोडची रेकी केली होती.
VIDEO: मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेची मार्शलला जबरदस्त मारहाण
त्यामुळे या गाडीचा वापर या सगळ्या प्रकरणात असल्याने एनआयएने ही कार जप्त करून तपास सुरू केला आहे. मात्र, ही मर्सिडीज बेंझ कार नर्मदा ऑफशोर कंपनीने 21 नोव्हेंबरलाच कार 24 या जुन्या कार विकत घेणाऱ्या कंपनीला विकली आहे. या व्यवहाराचे पैसे देखील नर्मदा कंपनीला कार 24 कंपनीने दिले आहेत.
Mumbai: NIA takes suspended police officer Sachin Waze (person donning oversized kurta in pic 2) to the place near businessman Mukesh Ambani's residence where explosives were recovered from a car last month; the agency recreates the crime scene as part of ongoing investigation. pic.twitter.com/DnLrSZJB9K
— ANI (@ANI) March 19, 2021
व्यवहार पूर्ण झाल्याने नर्मदा कंपनीने डिलिव्हरी नोट ही संबंधित कंपनीकडून घेतलेली आहे. यामुळे आपल्या कंपनीचा त्या मर्सिडीज बेंझ कारशी कोणताच संबंध नसल्याचा नर्मदा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव भंडारी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Incident, Mumbai, Mumbai police, Nia, Sachin vaze