Home /News /mumbai /

लॉकडाउन 4.0 मध्ये नवे नियम नवीन बदल, रेड झोनमध्ये आता...

लॉकडाउन 4.0 मध्ये नवे नियम नवीन बदल, रेड झोनमध्ये आता...

चौथ्या टप्प्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या चौथ्या टप्यात अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहे.

    मुंबई, 19 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परंतु,  या चौथ्या टप्यात अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहे. विशेष करून रेड झोन परिसरात आणखी सूट देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या या चौथ्या टप्प्यात आता  रेड झोनमध्ये दारूच्या दुकानातून दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, दारू विक्रीही  केवळ होम डिलिव्हरी केली जाणार आहे.  तर इतर  ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये दुकानं खुली असतील. तर कन्टेन्मेंट झोनमध्ये मात्र दुकानांवर बंदी कायम असणार आहे. तसंच रेड झोन परिसरातील इतर दुकाने, मॉल्स, गाळे आणि कारखाने पावसाळ्यापूर्वी काही दुरस्तीची काम करायची असेल तर ती उघडता येणार आहे. मात्र, यासाठी सकाळी 9 ते रात्री 5 एवढाच वेळ असणार आहे. त्याचबरोबर रेड झोन परिसरातील कारखाने  सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  बांधकाम साईटवरील पावसाळ्या पूर्व कामांसाठी डागडुजी करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लॉकडाउन लागू झाल्यापासून हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, आता हॉटेल किचनमधून होम डिलिव्हरी करता येणार आहे. काय सुरू राहणार रेड झोनमध्ये? - सर्व अत्यावश्यक सेवा, दुकानांना परवानगी - कारखानदारी सुरू करण्यास परवानगी - बांधकाम साईटवरील पावसाळा पूर्व कामांसाठी डागडुजी करण्यास परवानगी - हॉटेल किचनमधून होम डिलिव्हरी - बँक सेवा सुरू - कुरिअर सेवा पूर्वपदावर - मद्यांच्या दुकांनाना स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास चालू राहिल किंवा घरपोच सेवा असेल तर - इतर दुकाने, मॉल्स, गाळे आणि कारखाने पावसाळ्यापूर्वी काही दुरस्तीसाठी उघडता येणार. यासाठी वेळ सकाळी 9 ते रात्री 5 असणार - अत्यावश्यक आणि अनावश्यक बाबींसाठी ई कॉमर्स कंपन्यांना परवानगी अशी आहे नियमावली नव्या नियमावलीनुसार, 1) कंटेन्मेंट झोन, 2) रेड झोन, 3) नॉन रेड झोन असतील. ही नियमावली मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. हेही वाचा -गाणी ऐकून बरे होणार कोरोना रुग्ण; 'या' रुग्णालयाने सुरू केले उपचार दरम्यान, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. असे असतील नवे नियम -सरकारच्या वतीनं इ-कॉमर्स (ऑनलाईन) सामनासाठी आजपासून परवानगी दिली आहे. -रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये मैदानं, स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात येतील. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. - रेड झोनमध्ये दुकानं, मॉल्स, कारखाने खुली करण्याची परवानगी. केवळ देखभालीसाठी खुली करण्यात यावी. मात्र मॉल्समध्ये सामानांची विक्री केली जाणार नाही. ही दुकानं सकाळी 9 ते 5 पर्यंत खुली राहतील. -रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा किंवा कॅबना परवानगी नाही. बस या फक्त रेड झोन नसलेल्या परिसरात चालवल्या जातील. -रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रिक्षांसाठी चालक वगळता केवळ 2 लोकांना बसण्याची परवानगी असेल. तर, चारचाकीसाठी चालक वगळता 2 लोकांना प्रवास करण्याची परवानगी असेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या