जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांनो आता मॉलमध्ये जाण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य, जाणून घ्या सोमवारपासून लागू होणारे नवे नियम

मुंबईकरांनो आता मॉलमध्ये जाण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य, जाणून घ्या सोमवारपासून लागू होणारे नवे नियम

मुंबईकरांनो आता मॉलमध्ये जाण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य, जाणून घ्या सोमवारपासून लागू होणारे नवे नियम

मॉल तसंच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी अॅन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल (Antigen-Tests or Negative Report) अनिवार्य असणार आहे. सोमवारपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 मार्च : राज्यासह मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहरात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी 2,877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा सात ऑक्टोबरच्या उच्चांकी 2,848 संख्येपेक्षा जास्त आहे. राज्यात गुरुवारी चोवीस तासात 25833 कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्येत झालेल्या या भयंकर वाढीचा ठपका शहर प्रशासनानं नागरिकांवर ठेवला आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं म्हणत प्रशासनानं काही नियम (New Rules For Visiting Malls In Mumbai) लागू केले आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे. आता महानगरपालिकेनं मॉल तसंच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी अॅन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल (Antigen-Tests or Negative Report) अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती शुक्रवारी मनपा आयुक्त सुरेश काकाणी देणार आहेत. काकाणी यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं, की हे नवे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत. शॉपिंग मॉलशिवाय मॉलमध्ये असणाऱ्या चित्रपटगृहांसाठीही हे नियम लागू असणार आहेत. काकाणी म्हणाले, की तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीबाबत चर्चा झाली आणि आम्ही चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या चाचणीमुळे रुग्णांची संख्याही जास्त वाढणार आहे आणि हा आकडा गुरुवारपेक्षाही पुढे जाऊ शकतो. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित लोकांना ओळखणं आणि इतरांपासून दूर ठेवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरचं थैमान (Coronavirus peak in Maharashtra) महाराष्ट्राने अनुभवलं होतं. दररोज हादरवणारे आकडे आणि मृत्यूंचं थैमान महाराष्ट्र पाहात होता. त्यानंतर हळूहळी दररोज नव्याने सापडणाऱ्या कोरोनारुग्णांचा आकडा (Covid-19 Maharashtra) कमी कमी होत गेला. कोरोनावर मात केल्याच्या बातम्याही झाल्या आणि आता मात्र फेब्रुवारीपासून कोरोनारुग्णांच्या आकड्यांचा आलेख पुन्हा झराझर वर चढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात