मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चिंता वाढवणारी बातमी, नवी मुंबईतील शाळेत तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोना

चिंता वाढवणारी बातमी, नवी मुंबईतील शाळेत तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोना

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

नवी मुंबईतील एका शेतकरी विद्यालयात (Farmer school) 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई, 17 डिसेंबर : राज्य सरकारने (Maharashtra Government) नुकतंच शाळा सुरु करण्यास परवानगी दिली असताना नवी मुंबईतून (New Mumbai) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील एका शेतकरी विद्यालयात (Farmer school) 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतील गेल्या दोन आठवड्यातील ही आकडेवारी आहे. परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो शाळेत येत होता. पण त्या परदेशी व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

प्रशासन सतर्क, शनिवारी 600 विद्यार्थ्यांची चाचणी होणार

शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. महापालिका प्रशासनाकडून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. महापालिका प्रशासनाने शुक्रवारी दिवसभरात 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे. तर शनिवारी 600 विद्यार्थ्यांच्या चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा : सरकारी नोकरीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून 'विशेष' गिफ्ट

राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने देखील शिरकाव केला आहे. हा नवा विषाणू युरोपमधील ब्रिटनसह अनेक देशांमध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या विषाणूपासून बाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीणमध्ये ओमायक्रोनचा शिरकाव

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी व नारायणगाव येथील एकूण 7 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे rt-pcr नमुने घेण्यात आले. सदर नमुने 12 डिसेंबरला पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिनोम सिक्वेसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

First published:

Tags: Corona, महाराष्ट्र