मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला 'हा' सल्ला, म्हणाले...

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला 'हा' सल्ला, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात सामाजिक संतुलन बिघडल्या असल्याचं वक्तव्?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात सामाजिक संतुलन बिघडल्या असल्याचं वक्तव्?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात सामाजिक संतुलन बिघडल्या असल्याचं वक्तव्?

    मुंबई, 16 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्थापन झाल्यापासून सामाजिक वेगवेगळे अंतर्गत वाद वाढले आहेत, सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं यानंतर राज ठाकरे यांच्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांचे देखील तोंडसुख घेतले होते. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या या विधानावर वक्तव्य केलेले आहे.

    शरद पवार यांना राज ठाकरे यांच्या या विधानावर विषयी विचारले असता राज ठाकरे यांना फार सल्ला काही देऊ शकत नाही, पण राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी जे लिखाण केले आहे ते वाचावे असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या विधानानंतर पुण्यातून देखील मराठा आणि संभाजी ब्रिगेड संघटनांच्या वतीने राज ठाकरे यांच्याविरोधात वेगवेगळी वक्तव्य आली होती. आता थेट शरद पवार यांनीच राज ठाकरे यांना याबाबत सल्ला दिला आहे.

    भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाच्या संदर्भात अधिकार नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या वतीने राज्यात सामाजिक ऐक्य करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी आणि इतर समाजाचे मेळावे घेणार असल्याचं सांगत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

    "जेवणाला निमंत्रण दिलं मात्र, हात बांधलेले" आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका

    शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

    केंद्राने जातीनिहाय आरक्षणाचे राज्याचे अधिकार काढून घेतले

    केंद्राने हे अधिकार पुन्हा बहाल केले अस बोलत आहेत

    ही शुद्ध फसवणूक आहे

    इंद्रा सहानी प्रकरणात आरक्षण 50 टक्के पेक्षा अधिक देता येणार नाही हे स्पष्ट आहे

    अस असताना 2 वर्षांपूर्वी 10 टक्के ईसीबीसीचे आरक्षण दिलं

    देशात जवळपास सर्वच राज्यात 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण अधिक आहे

    शरद पवारांनी सांगितली इतर राज्यांची आकडेवारी

    जेवणाला निमंत्रण दिले हात बांधून सांगताय जेवा आता

    या निर्णयाविरोधात जनमत तयार करन्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे

    50 टक्यांचा निर्णय काढून टाका

    जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे

    जनगणनेशिवाय समान संधी मिळणार नाहीत

    केंद्राच्या निर्णयाविरोधात जनमत तयार करु

    सभा घेऊन जनमत तयार करणार

    50 टक्यांची मर्यादा आल्यामुळे कोणाला आरक्षण मिळणार नाही. हे धोरण केंद्र सरकारने बदलाव. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस जनमत तयार करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं

    जातीनिहाय डेटा का देत नाही? त्यांना भीती असेल की मागास जातींना जास्त आरक्षण द्यावं लागेल, शरद पवार यांचा केंद्र सरकारवर आरोप

    मोदींना 100 लाख कोटी नव्हे 1000 लाख कोटी अस म्हणायचं होत, पण त्यांच्या कडून एक शून्य राहून गेला. शरद पवारांची नरेंद्र मोदी यांच्यावर कोपरखळी

    राज ठाकरे यांनी प्रबोधनकार यांचं लिखाण वाचावं, म्हणजे जातीपातीच्या बाबी त्यांना नीट कळतील

    राज्यसभेत महिला खासदारांना झालेली धक्काबुक्की

    पेगसेस आणीं कृषी कायदे रद्द करा, पेट्रोल डिझेल ची महागाई कमी करा या मागण्या होत्या,

    केंद्र सरकार च म्हणणं होतं की आम्ही चर्चा करू

    पण केंद्र सरकारच्या वतीने कुठेही लेखी पत्रिकेत हे नमूद केलं नाही.

    अशा परिस्थितीत त्यांनी विमा विधेयक आणलं

    याला आमचा विरोध होता

    या गोंधळात सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली

    संसदेच्या इतिहासात असा प्रकार आजपर्यंत घडला नाही

    संसद सदस्यांवर हा एक प्रकारचा हल्ला होता

    First published:
    top videos

      Tags: Raj Thackeray, Sharad pawar