मुंबई 21 जून: अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून हळू हळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. राज्य सरकारच्या आग्रही मागणीनंतर मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. आता फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे पुणे ते दौंड ही रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केलीय.
सरकारी कार्यालये आणि इतर व्यवसाय सुरू झाल्याने लोकांची ये जा वाढली आहे. मात्र अजुनही सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. दौंड आणि परिसरातून दररोज हजारो लोक पुण्यात कामानिमित्त येत असतात. आता रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन कराव लागतो. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, लोकसभेत सर्वात जास्त प्रश्न विचारणार देशातील टॉप फाईव्ह खासदारांची यादी समोर आला आहे. या यादीत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदाराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
Local Trains for individuals working for the essential services from Suburbs to Mumbai have now started. Requesting Hon.@PiyushGoyal Ji to start Train from Daund to Pune (&vice versa) on similar grounds so that these individuals can commute w/o any difficulties.@drmpune
— Supriya Sule (@supriya_sule) June 22, 2020
सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांत सुळे, भामरे आणि डॉ. कोल्हे यांचा समावेश आहेच. तसंच शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी 195 प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक मिळविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 194 प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
हेही वाचा -
इस्रायलच्या कंपनीने तयार केला मास्क, 99 टक्के कोरोना व्हायरसचा करतो खात्मा
केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका;
संपादन - अजय कौटिकवार