जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अजितदादांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही कोरोनाला हरवलं, हॉस्पिटलमधून एकाच दिवशी डिस्चार्ज

अजितदादांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही कोरोनाला हरवलं, हॉस्पिटलमधून एकाच दिवशी डिस्चार्ज

अजितदादांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही कोरोनाला हरवलं, हॉस्पिटलमधून एकाच दिवशी डिस्चार्ज

खासदार सुनील तटकरे यांना 27 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 नोव्हेंबर :  राष्ट्रवादीचे नेते (national congress party) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Sunil Tatkare) यांनी सुद्धा कोरोनावर मात केली आहे. सुनील तटकरे यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून (breach candy hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. खासदार सुनील तटकरे यांची 26 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता.  खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सुनील तटकरे यांना 27 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच हॉस्पिटलमध्ये अजित पवार हे सुद्धा दाखल झाले होते. बॅटिंग नाही तर जाडेपणाची स्पर्धा! युवराजनं उडवली रोहित-पंतची खिल्ली आज दुपारी अजित पवार यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अजितदादांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळांनी सुनील तटकरे यांचीही कोरोनाची चाचणी ही निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. त्यामुळे सुनील तटकरे यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुनील तटकरे हे आपल्या गावाकडे रवाना झाले आहे. याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचाही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली. राज्यपाल नियुक्त 12 नावं फडणवीस आणि राज्यपाल बाजूला काढतील, राष्ट्रवादीचा आरोप तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज शासकीय  हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात